• Wed. Oct 15th, 2025

निमगाव वाघातील ग्रामस्थांच्या सेवेसाठी रुग्णवाहिका

ByMirror

Jul 28, 2023

पी.आर.एम. सॉफ्टवेअर सोल्युशनचा सामाजिक उपक्रम

राजेंद्र शिंदे यांना युवा उद्योजक तर शालन शिंदे यांना आदर्श माता पुरस्कार जाहीर

अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे ग्रामस्थांच्या आरोग्याच्या दृष्टीकोनाने व तातडीने उपचार मिळण्याच्या हेतूने पी.आर.एम. सॉफ्टवेअर सोल्युशन कंपनीच्या माध्यमातून उद्योजक राजेंद्र काशिनाथ शिंदे यांनी गावासाठी रुग्णवाहिका दिली. या रुग्णवाहिकेचे पूजन भानुदास ठोकळ यांच्या हस्ते झाले. यावेळी डोंगरे संस्थेचे अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे, डॉ. विजय जाधव, पै. अनिल डोंगरे, सोसायटीचे संचालक अजय ठाणगे, जालिंदर आतकर, संजय डोंगरे, पिंटू जाधव, मीरा पुंड, आकाश पुंड, श्रीरंग आतकर, राजू हारदे, विजय जाधव, पै. संदीप डोंगरे, भरत बोडखे, सागर शिंदे, मारुती निकम, अनिता शिंदे, भास्कर फलके, लक्ष्मण चौरे आदींसह शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


पै. नाना डोंगरे म्हणाले की, गावात असलेल्या रुग्णवाहिकेमुळे ग्रामस्थांना तातडीने आरोग्य सेवा उपलब्ध होणार आहे. आजारी व्यक्ती, अपघात प्रसंगी व गरोदर महिलांना जलदगतीने रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी रुग्णवाहिकेचा उपयोग होणार आहे. गावत मोठे दवाखाने नसल्याने ग्रामस्थांना शहरात जावे लागते. यासाठी खासगी वाहन अथवा रुग्णवाहिका बोलवावी लागत होती. या रुग्णवाहिकेद्वारे तातडीची आरोग्य सेवा ग्रामस्थांना उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी सांगितले.


राजेंद्र काशिनाथ शिंदे यांनी गावासाठी रुग्णवाहिका, शववाहिका उपलब्ध करुन देऊन जिल्हा परिषद शाळेचे सुशोभीकरण केले. तर गावातील मारुती मंदिर व तुळजाभवानी मंदिराच्या जीर्णोध्दारासाठी केलेली मदत, वृक्षरोपण व संवर्धन उपक्रम आदी विविध सामाजिक उपक्रमाची दखल घेऊन स्व.पै. किसनराव डोंगरे बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने त्यांना युवा उद्योजक पुरस्कार जाहीर करण्यात आला. तर श्रीमती शालन काशिनाथ शिंदे यांना देखील आदर्श माता पुरस्कार जाहीर करण्यात आले आहे. या पुरस्काराचे वितरण 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिनानिमित्त घेण्यात आलेल्या काव्य संमेलनाच्या कार्यक्रमात होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *