• Sat. Mar 15th, 2025

निंबळकच्या यात्रेनिमित्त कुस्ती आखाडा गाजला चितपट कुस्त्यांनी

ByMirror

May 7, 2023

महिला कुस्तीपटू व नामवंत मल्लांच्या रंगल्या कुस्त्या

अहमदनगर (प्रतिनिधी)- निंबळक (ता. नगर) येथील श्री खंडोबा यात्रेनिमित्त भरविण्यात आलेल्या कुस्ती हंगामा लाल मातीच्या आखाड्यातील कुस्त्यांनी रंगला होता. हलगी-डफाचा निनाद, बजरंग बलीचा जयघोष, आखाड्या भोवती जमलेल्या पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये उत्साहपूर्ण वातावरणात महिला कुस्तीपटू व युवा मल्लांच्या कुस्त्या पार पडल्या. चितपट कुस्त्यांचा थराराने ग्रामस्थांच्या डोळ्यांचे पारणे फिटले. मल्लांनी डाव-प्रतिडावाने आपल्या उत्कृष्ट खेळाची चुणूक दाखवली.


या हंगामात पै. संदिप डोंगरे (निमगाव वाघा) विरुध्द पै. पवन रोहोकले (भाळवणी) यांची कुस्ती प्रेक्षणीय ठरली. यामध्ये दोन्ही मल्ल तुल्यबळ असल्याने कुस्ती बरोबरीत सोडविण्यात आली. तर इतर दिग्गज मल्लांच्या चितपट कुस्तींनी उपस्थितांची मने जिंकली.


प्रारंभी शिवसेनेचे (ठाकरे गट) जिल्हाप्रमुख शशीकांत गाडे यांच्या हस्ते डोंगरे विरुध्द रोहोकले या मल्लांची कुस्ती लावण्यात आली. यावेळी जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष प्रताप पाटील शेळके, जिल्हा परिषद सदस्य माधवराव लामखडे, जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष संपतराव म्हस्के, डॉ. एस.एस. दीपक, जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले, माजी सभापती रामदास भोर, आनंद शेळके, जिल्हा तालिम संघाचे खजिनदार पै. नाना डोंगरे, केतन लामखडे, अजय लामखडे, उपसरपंच बाळासाहेब कोतकर, अंजली देवकर, सोसायटी चेअरमन भाऊसाहेब गायकवाड, अनिल गुंजाळ, साहेबराव बोडखे, संजय गेरंगे, घनश्याम म्हस्के, पै. युवराज करंजुले आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.


हंगामामध्ये चितपट कुस्ती होताच उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात विजयी मल्लास दाद दिली. तर विजयी, उपविजयी मल्लांना रोख बक्षिस देण्यात आले. आमदार निलेश लंके व विधान सभेचे माजी उपाध्यक्ष विजय औटी यांनी कुस्ती हंगामाला भेट देऊन कुस्ती मल्लांचे कौतुक करुन ग्रामस्थांना यात्रेच्या शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *