• Fri. Jun 19th, 2026

Mirrornews24

Marathi News

दिव्यांग मंत्रालयाची घोषणा झाल्याबद्दल प्रहार अपंग क्रांती संस्थेचा जल्लोष

ByMirror

Nov 21, 2022

पेढे वाटून राज्य सरकारच्या निर्णयाचे स्वागत

दिव्यांग मंत्रालयाच्या माध्यमातून प्रश्‍न सुटण्यास मदत होणार -अ‍ॅड. पोकळे

अहमदनगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्यात स्वतंत्र्य दिव्यांग मंत्रालयास मंजुरी देणार्‍या ऐतिहासिक निर्णयाचे प्रहार अपंग क्रांती संस्था संलग्न महाराष्ट्र राज्य मूकबधिर दिव्यांग कल्याण संघटनेच्या वतीने शहरात लाडू वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. या आनंदोत्सवात शहर व जिल्ह्यातील दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.


छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर हा आनंदोत्सव साजरा झाला. यावेळी जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. लक्ष्मण पोकळे, जिल्हा सचिव हमिद शेख, शहर उपाध्यक्ष संदेश रपारिया, किशोर सूर्यवंशी, मुकबधीर संघटनेचे राज्य अध्यक्ष प्रकाश शिंदे, प्रहार संघटना सदस्य दिपक जाधव, प्रहार संघटना प्रतिनिधी श्रीनिवास येनगंदूल, सतीश पंदपुरे, संजय शेळके, आकाश परभणे, वैभव मोरे, अजय कोडम आदी उपस्थित होते.


दिव्यांगांनी वाडिया पार्क येथील महात्मा गांधी पुतळा ते जुने बस स्थानक येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते मार्केटयार्ड चौक येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या दरम्यान रॅली काढून हा जल्लोष केला. महापुरुषांच्या पुतळ्यास अभिवादन करुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राज्यमंत्री तथा प्रहारचे संस्थापक अध्यक्ष बच्चुभाऊ कडू यांचे विशेष आभार मानण्यात आले. राज्यात दिव्यांगांचे प्रश्‍न गंभीर बनत असताना, राज्य सरकारने स्वतंत्र्य दिव्यांग मंत्रालयाला मंजूरी दिल्याने दिव्यांगांचे अनेक प्रश्‍न सुटण्यास मदत होणार आहे. तर दिव्यांगांना सुखी, समाधानाने जीवन जगता येणार असल्याची भावना यावेळी दिव्यांग बांधवांनी व्यक्त केली.


By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *