गुरु अर्जुन देवजी शहिद झाले, मात्र अन्यायापुढे झुकले नाही -आ. संग्राम जगताप
अहमदनगर (प्रतिनिधी)- शीख धर्माचे पाचवे गुरु अर्जुन देवजी यांच्या शहिदी दिनानिमित्त तारकपूर येथे गुरु नानक देवजी (जीएनडी) ग्रुपच्या वतीने नागरिकांना प्रसाद वाटप करण्यात आले. आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते प्रसाद वाटपाला प्रारंभ करण्यात आले. यावेळी बाबा कर्नलसिंग, जनक आहुजा, हमाल पंचायतचे अध्यक्ष अविनाश घुले, राष्ट्रवादी युवकचे शहर जिल्हाध्यक्ष इंजि. केतन क्षीरसागर, संजय आहुजा, मनिश खुराणा, प्रदीप पंजाबी, राकेश गुप्ता, विकी कंत्रोड, गुर्ली अवतार, करण आहुजा, किशोर कंत्रोड, शीला तलवार, मनोज मनोचा, रोहित बत्रा, गौरव कंत्रोड, अमन खुराणा, अक्षय खुराणा, दिनेश खुराणा, निकिता आहुजा, आंचल कंत्रोड आदी उपस्थित होते.
आमदार संग्राम जगताप म्हणाले की, गुरु अर्जुन देवजी शहिद झाले, मात्र अन्यायापुढे झुकले नाही. अमानुष छळ सहन करुन धर्माप्रती ते निष्ठावान राहीले. शीख धर्मासाठी शहीद होणारे पहिले गुरू म्हणून ते अजरामर झाले. त्यांचे हौतात्म्य हे शीख धर्माच्या इतिहासाला कलाटणी देणारे ठरले. त्यांचे बलिदान आजही समाजासाठी प्रेरणा असल्याचे त्यांनी सांगितले.

जनक आहुजा म्हणाले की, गुरू अर्जुन देव मानवतेचे खरे सेवक, धर्माचे रक्षक आणि धीर गंभीर स्वभावाचे म्हणून प्रसिद्ध होते. ते रात्रंदिवस लोकांची सेवा करत असत. सर्व धर्मांबाबत माहिती आणि आदर असणारे गुरू म्हणूनही ते देशाला परिचित आहेत. त्यांचे बलिदान शीख समाजापुढे प्रेरणा म्हणून समोर आले आणि शीख समाजाने कोणत्याही अन्याय, अत्याचारापुढे न झुकता त्याचा सामना केला असल्याचे त्यांनी सांगितले.