• Sun. Jun 21st, 2026

Mirrornews24

Marathi News

केडगावला अर्पित सेतू केंद्राचे उद्घाटन

ByMirror

Oct 8, 2022

महिला वर्ग, विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिकांची सोय होणार -एन. एम. पवळे

अहमदनगर (प्रतिनिधी)- केडगाव, नेप्ती रोड येथील अर्पित सर्व्हिसेसच्या सेतू केंद्राचे उद्घाटन माजी सहाय्यक आयुक्त एन. एम. पवळे यांच्या हस्ते झाले. शहराच्या नऊ ठिकाणी कार्यरत असलेल्या अर्पित सर्व्हिसेसच्या माध्यमातून केडगाव परिसरातील नागरिकांना सेतू केंद्राची सेवा दिली जाणार आहे.


या उद्घाटनाप्रसंगी दीपक मेढे, अर्पित सर्व्हिसेसचे संस्थापक स्वप्निल पाचारणे, संदीप पाचारणे, संदीप डोळस, संपत पायाळ, राजकुमार जावळे, सोपान डोळस, अनिकेत पठारे, विजय कोतकर, सोमनाथ कोतकर, विकास डोळस, विपुल राऊत, राहुल पायाळ, आकाश शिंदे, अतुल औटी आदी उपस्थित होते.


एन. एम. पवळे यांनी ऑनलाईन सेवेमुळे केडगाव येथील महिला वर्ग, विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिकांची सोय होणार असल्याचे सांगितले. या सेतू केंद्राच्या माध्यमातून नागरिकांना विविध उपयोगी पडणारे नॉन क्रिमीलेअर, डोमिसाईल, नॅशनॅलिटी, जात प्रमाणपत्र, उत्पन्नाचे दाखले, विवाह प्रमाणपत्र, पॅन कार्ड, मतदान व आधार नोंदणी विविध प्रमाणपत्र व दाखल्यांचे कामे करुन दिली जाणार असल्याची माहिती स्वप्निल पाचारणे यांनी दिली.


By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *