विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्या शिक्षकांचा होणार सन्मान
तर शिक्षक दिनी रंगणार राज्यस्तरीय काव्य संमेलन
अहमदनगर (प्रतिनिधी)- सामाजिक, शैक्षणिक, साहित्य, कला, क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्या शिक्षकांचा स्व.पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ व धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने शिक्षक दिनी (दि.5 सप्टेंबर) राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. तर शिक्षक दिनानिमित्त राज्यस्तरीय काव्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती डोंगरे संस्थेचे अध्यक्ष पै. नाना डोंगरे यांनी दिली.
स्व.पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ व धर्मवीर ग्रामीण वाचनालयाच्या वतीने सामाजिक, शैक्षणिक, साहित्य, कला, क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रात सातत्याने कार्य सुरु आहे. विविध क्षेत्रात शिक्षक रात्रंदिवस कष्ट करुन समाज घडविण्याचे कार्य करतात. मात्र त्यांचे कार्य प्रकाशझोतात येत नाही. त्यांचे कार्य समाजापुढे आनण्यासाठी व त्यांच्या कार्यातून इतरांना प्रेरणा मिळण्यासाठी त्यांचा सन्मान केला जाणार यासाठी प्रस्ताव पाठविण्याचे संस्थेच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे. संस्थेची पुरस्कार समिती आलेल्या प्रस्तावातून पुरस्कार्थींची नावे जाहीर करणार आहे.
शिक्षक दिनानिमित्त होणार्या कार्यक्रमात आदर्श शिक्षकांना पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. तर याचवेळी काव्य संमेलन रंगणार असून, यामध्ये राज्यातील कवी सहभागी होणार आहेत. या काव्य संमेलनात ज्येष्ठ कवींचा देखील सन्मान केला जाणार आहे. या पुरस्कारासाठी शिक्षकांनी आपल्या कार्याची माहिती असलेला प्रस्ताव 15 ऑगस्ट पर्यंत पै. नाना डोंगरे (अध्यक्ष, स्व.पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था) ता. जि. अहमदनगर 414005 महाराष्ट्र या पत्त्यावर पाठविण्याचे सांगण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी या 9226735346, 8605775261 या नंबरवर संपर्क साधण्याचे म्हंटले आहे.