• Thu. Jan 29th, 2026

अरणगावच्या अवतार मेहेरबाबा सेंटरचा 62 वा स्थापना दिन साजरा

ByMirror

Jan 4, 2023

बाबांची भजने व मुलांचा सांस्कृतिक कार्यक्रमाचा रंगला सोहळा

अहमदनगर (प्रतिनिधी)- अरणगाव येथील अवतार मेहेरबाबा सेंटरचा 62 वा स्थापना दिन विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. कार्यक्रमात मेहेर बाबांची भजने व मुलांचा सांस्कृतिक कार्यक्रम रंगला होता.


मेहेरबाबा यांच्या प्रतिमेस अभिवादन करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी अवतार मेहरबाबा ट्रस्टचे चेअरमन श्रीधर (काका) केळकर, जाल दस्तूर, रमेश जंगले, श्री गोपी, प्रसाद राजू, योहान, सरपंच स्वाती गहिले, फारुख बस्ताने, प्रभावती पाटील, ताराबाई भालेकर, नवले काका, सोमनाथ गहिले, दयानंद कांबळे, जल्लू, हरी काका, माधव कांबळे, जालू पुंड, रावसाहेब, नीलिमा कांबळे, अनिता पाबळे, जया जंगले, मधुकर डाडर, दीपक थाडे, पंढरीनाथ भस्मे, नितीन थाडे, अबुलकर, सुरेखा डाडर, मेहेर भुजी, जॉन आदींसह अरणगावातील ग्रामस्थ व बाबा प्रेमी भाविक उपस्थित होते.


अरणगाव सेंटरची स्थापना सन 1960 साली श्री अवतार मेहेरबाबा यांच्या हस्ते झाली होती. तेव्हापासून आजपर्यंत जंगले मास्तर यांचे कुटुंबीय व गावातील बाबाप्रेमी भाविक सर्वजण मिळून सेंटर चालवत आहेत. प्रत्येक गुरुवारी संध्याकाळी सात ते नऊ पर्यंत बाबांचे भजन होत असतात. तसेच सामाजिक कार्यक्रम देखील राबविण्यात येत असल्याची माहिती ट्रस्टचे चेअरमन श्रीधर (काका) केळकर यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *