• Thu. Jun 25th, 2026

Mirrornews24

Marathi News

सामाजिक वनीकरणचे भोयरेपठार ते कामरगाव रस्त्याच्या दुतर्फा झाडांच्या लागवडीस प्रारंभ

ByMirror

Jul 3, 2022

वृक्षरोपण व संवर्धन चळवळ फक्त शासनापुरती मर्यादीत न राहता जबाबदार नागरिकांनी योगदान द्यावे -दिलीप जिरे

अहमदनगर (प्रतिनिधी)- सृष्टीचे अस्तित्व पर्यावरणाशी जोडलेले असून, पर्यावरणाच्या सुरक्षिततेसाठी वृक्षरोपण काळाची गरज बनली आहे. वृक्षरोपण व संवर्धन ही चळवळ फक्त शासनापुरती मर्यादीत न राहता यामध्ये जबाबदार नागरिकांनी योगदान देण्याची गरज आहे. रस्ता दुतर्फा वृक्षरोपणाने परिसराचे सौंदर्य खुलणार असून, जमिनीची धूप थांबून पर्यावरण संवर्धन होणार असल्याचे प्रतिपादन वनक्षेत्रपाल दिलीप जिरे यांनी केले.


सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने भोयरेपठार ते कामरगाव 2 किलोमीटर रस्त्याच्या दुतर्फा वृक्ष लागवड अभियानाचे प्रारंभ वृक्षरोपणाने करण्यात आले. यावेळी वनरक्षक अफसर पठाण, सचिन थोरात, सरपंच बाबा टकले, ग्रामपंचायत सदस्य अमोल टकले, वृक्षमित्र तथा ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे, हरियालीचे सुरेश खामकर, ग्रामस्थ संदीप उरमुडे, दगडू उरमुडे, लहानू कदम, धोंडीभाऊ टकले, रामदास टकले, आण्णा उरमुडे, कर्मचारी संतोष रोहोकले, युवराज तिपोळे आदी उपस्थित होते.


पै. नाना डोंगरे म्हणाले की, जगण्यासाठी ऑक्सिजन आवश्यक असून, ऑक्सिजन देणारी देशी झाडे लावण्याची गरज आहे. प्रत्येक गावात वृक्षरोपण व संवर्धन चळवळ बहरल्यास पर्यावरणाचे प्रश्‍न सुटणार आहे. ढासाळलेले निसर्गाचे समतोल वृक्षरोपणाने साधले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.


सामाजिक वनीकरणच्या वतीने भोयरेपठार ते कामरगाव 2 किलोमीटर रस्त्याच्या दुतर्फा शिशु, चिंच, कडूलिंब, कांचन, करंज, आवळा, सीताफळ आदी देशी प्रजातींची लागवड सुरु करण्यात आली आहे. ही झाडे लावून त्याचे संवर्धन देखील केले जारणार असल्याची माहिती अफसर पठाण यांनी दिली.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *