सामाजिक व क्रीडा क्षेत्रात डोंगरे कुटुंबीयांचे योगदान दिशादर्शक -कोंडीभाऊ फलके
अहमदनगर (प्रतिनिधी)- कुस्तीपटू पै. संदिप डोंगरे याची नगर तालुका तालिम सेवा संघाच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल निमगाव वाघा येथे ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. गावातील नवनाथ विद्यालयात तालिम संघाचे सचिव पै. बाळू भापकर, उपाध्यक्ष काशीनाथ पळसकर, मुख्याध्यापक किसन वाबळे यांनी तसेच नवनाथ मंदिराच्या सभा मंडपात उद्योजक कोंडीभाऊ फलके, माजी सरपंच साहेबराव बोडखे, ह.भ.प. जयसिंग महाराज मडके, भागचंद जाधव, पै. गणेश फलके यांनी डोंगरे याचा सत्कार केला.
या सत्कार कार्यक्रमासाठी जिल्हा तालिम संघाचे खजिनदार पै. नाना डोंगरे, माजी प्राचार्य नामदेव कदम, निळकंठ वाघमारे, दत्तात्रय जाधव, चंद्रकांत पवार, शुभांगी धामणे, मंदा साळवे, सुवर्णा जाधव, भानुदास लंगोटे, उत्तम कांडेकर, गुलाब कापसे, शिवाजी जाधव, सुभाष जाधव, पर्बती कदम, गंगाधर कापसे, तुकाराम खळदकर, लहानबा जाधव आदी उपस्थित होते.
पै. बाळू भापकर म्हणाले की, कुस्ती खेळातील खेळाडूची संघटनेत वर्णी लागल्याने खेळाला चालना मिळणार आहे. पै. नाना डोंगरे यांच्या पाऊलावर पाऊल ठेऊन त्यांचा मुलगा संदिप संघटनेच्या माध्यमातून कुस्ती खेळ व खेळाडूंसाठी योगदान देणार आहे. श्री नवनाथ युवा मंडळाच्या माध्यमातून त्याचे सुरु असलेले सामाजिक कार्य कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले.
उद्योजक कोंडीभाऊ फलके यांनी सामाजिक व क्रीडा क्षेत्रात डोंगरे कुटुंबीयांचे योगदान दिशादर्शक आहे. ग्रामीण भागातील खेळाडूंना घडविण्यासाठी व युवकांना सामाजिक कार्याची आवड लाऊन दिशा देण्याचे त्यांचे सातत्याने कार्य सुरु आहे. संदिप डोंगरे याची झालेल्या निवडीच्या माध्यमातून कुस्ती खेळाला चालना मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.