एसटीचे पूजन करुन प्रवासी व नागरिकांना मिठाई वाटप
अहमदनगर (प्रतिनिधी)- राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून सुरु करण्यात आलेल्या पहिल्या नगर-पुणे शिवाई या इलेक्ट्रिक बसचे केडगाव येथील पहिल्या थांब्यावर केडगाव जागरूक नागरिक मंचच्या वतीने भव्य स्वागत करण्यात आले. बसला पुष्पहार घालून पूजन करण्यात आले. तर उपस्थित प्रवासी व नागरिकांना पेढे व मिठाईचे वाटप करण्यात आले.
एसटीच्या वर्धापनदिनी बुधवारी (1 जून) तारकपूर बस स्थानक येथून राज्यातील पहिली इलेक्ट्रिक बस अहमदनगर मधून पुणे कडे धावली. केडगावच्या पहिल्या बस थांबा येथे चालक गणेश साबळे व वाहक जयदेव हेंद्रे यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा देण्यात आल्या. ही पहिली इलेक्ट्रिक बस पाहण्यासाठी नागरिकांनी देखील गर्दी केली होती. सजवलेल्या इलेक्ट्रिक बस सोबत सेल्फी घेण्याचा मोह अनेकांना आवरला नाही.
पर्यावरण पूरक बस हा शासनाचा पर्यावरण रक्षणासाठी मैलाचा दगड ठरेल असा विश्वास मंचचे अध्यक्ष विशाल पाचारणे यांनी व्यक्त केला. डॉक्टर बागले यांनी सर्व नागरिकांनी या सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन केले. यावेळे नगर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष योगेश गुंड, शिरीष धाहींजे, हाजी रशिद शेख, श्याम रसाळ, राजेंद्र पवार, राजेंद्र भोसले, गणपत जाधव, जे.बी. शिंदे, सदाशिव मोहिते, वाल्मिकी तिवारी, संजय कुलकर्णी, श्रीकांत कुलकर्णी, विठ्ठल महाराज कोतकर, मंचचे प्रविण पाटसकर, उस्मान गनी मनियार, मंदार सटाणकर आदी उपस्थित होते.