• Wed. Mar 26th, 2025

शहरात रंगला रॅम्पवॉक करुन फॅशनचा जलवा

ByMirror

Feb 8, 2022

लहान मुले, युवक-युवतींचा सहभाग

अहमदनगर (प्रतिनिधी)- हेल्पिंग हॅण्डस युथ फाऊंडेशनच्या वतीने लहान मुले, युवक-युवतींसाठी घेण्यात आलेला फॅशन शो उत्साहात पार पडला. रॅम्पवर अवतरलेल्या तरुणाईने सर्वांचे लक्ष वेधले. तर विविध गाण्यांवर बहारदार नृत्य व रॅम्पवॉक करुन उपस्थितांची मने जिंकली. यामध्ये नगरच्या मॉडेल्सचा उत्सफुर्त सहभाग लाभला. लहान मुलांनी केलेल्या रॅम्पवॉकने कार्यक्रमाची रंगत वाढली.
कार्यक्रमाचे उद्घाटन नगरसेवक बाळासाहेब बोराटे व डॉ. गोपाळ बहुरुपी यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. चेतना बहुरुपी, नगरसेवक योगीराज गाडे, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष सुभाष गुंदेचा, हेल्पिंग हॅण्डसचे संस्थापक अध्यक्ष भैय्या बॉक्सर, अ‍ॅड. परवेज पटेल, पप्पू इनामदार, हिना शेख, वाजिद शेख, किरण बोरुडे आदी उपस्थित होते.
प्रास्ताविकात हेल्पिंग हॅण्डसचे संस्थापक अध्यक्ष भैय्या बॉक्सर यांनी नवोदित कलाकार व युवकांसाठी संस्थेच्या वतीने सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक व क्रीडा क्षेत्रात राबविण्यात येणार्‍या विविध उपक्रमाची माहिती दिली. डॉ. गोपाळ बहुरुपी यांनी कलाकारांना हेल्पिंग हॅण्डसच्या माध्यमातून एक चांगला व्यासपिठ निर्माण झाला आहे. मॉडलिंगमध्ये करिअर करणारे युवक-युवती पुढे येत असून, त्यांना योग्य दिशा व प्रोत्साहन देण्याची गरज आहे. अशा कार्यक्रमांमुळे युवकांमध्ये आत्मविश्‍वास निर्माण होणार असल्याचे त्यांनी सांगितले. नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांनी युवकांनी युवकांसाठी घेतलेला हेल्पिंग हॅण्डसचा उपक्रम कौतुकास्पद आहे. अशा कार्यक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये कला-गुण विकसीत होत असतात. कोरोनामुळे अनेक विद्यार्थ्यांना आपेल कला-गुण सादर करता आले नाहीत. मात्र हेल्पिंग हॅण्डसने युवकांसाठी व्यासपिठ निर्माण केले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


या फॅशन शो मध्ये मिस लहान गट मुली विनर- अक्षदा वर्मा, फर्स्ट रनरअप- मनस्वी चोथे, सेकंड रनरअप- निकिता कांगणे, थर्ड रनरअप- पुर्वा परंडकर, बेस्ट वॉक- अमानी शेख, मिस मोठा गट मुली विनर- गायत्री वेदपाठक, फर्स्ट रनरअप- मनस्वी बळीद, सेकंड रनरअप- प्राजक्ता सावेडकर, थर्ड रनरअप- कविता विधाते, बेस्ट वॉक- प्रेरणा लखन, मुले (किड्स) विनर- असद सय्यद, फर्स्ट रनरअप- अब्दुल अहद सय्यद, सेकंड रनरअप- शोएब पठाण, बेस्ट वॉक- अरहान सय्यद, मुली (किड्स) विनर- इरा पालवे, फर्स्ट रनरअप- अन्वी गोफणे, सेकंड रनरअप- आयेशा सय्यद, थर्ड रनरअप- माहीरा शेख, बेस्ट वॉक- संस्कृती परदेशी यांनी बक्षिसे पटकाविली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *