• Sun. Jun 21st, 2026

Mirrornews24

Marathi News

शहरातील त्या भागात अगोदरच घरफोडी व दरोडा त्यात रस्त्यांवरील पथदिवे बंद

ByMirror

Jan 3, 2023

काटवन खंडोबा रोड, गाझीनगर व साई कॉलनी भागातील पथ दिवे सुरु करण्याची रिपाई अल्पसंख्यांक विभागाची मागणी

नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण

अहमदनगर (प्रतिनिधी)- घरफोडी, दरोड्यामुळे नागरिक भयभीत असताना रात्री रस्त्यांवरील पथदिवे बंद पडल्याने आनखी नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. तातडीने महापालिका प्रशासनाने काटवन खंडोबा रोड, गाझीनगर व साई कॉलनी भागातील पथ दिवे सुरु करण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई) अल्पसंख्यांक विभागाच्या वतीने करण्यात आली आहे.


या मागणीसाठी रिपाईच्या शिष्टमंडळाने आयुक्त डॉ. पंकज जावळे यांची भेट घेऊन निवेदन दिले. यावेळी रिपाई अल्पसंख्यांक विभागाचे शहराध्यक्ष गुलाम अली शेख, रिपाईचे शहर कार्याध्यक्ष दानिश शेख, नौमान सय्यद, साहिल बागवान, रब्बानी दस्तगीर, जुबेर बागवान आदी उपस्थित होते.


काटवन खंडोबा रोड, गाझीनगर व साई कॉलनी भागातील रस्त्यांवरील सर्व पथ दिवे बंद आहेत. या भागात नुकतेच काही दिवसांपूर्वी घरफोडी व दरोडे सारखे गंभीर गुन्हे घडले आहेत. अशा वातावरणात परिसरात रात्री अंधार असल्याने चोरांना एकप्रकारे प्रोत्साहन मिळत आहे.

अशा घटनामध्ये एखाद्या नागरिकाची जीव जाण्याची देखील शक्यता आहे. तसेच या परिसरात अंधकार असल्याने रात्री लहान-मोठे अपघात घडत आहे. हा प्रश्‍न गांभीर्याने घेऊन सदर परिसरातील सर्व पथदिवे सुरु करण्याची मागणी रिपाईच्या वतीने करण्यात आली आहे. अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *