कोरोनाच्या टाळेबंदीनंतर बंद झालेली सदरची बस सेवा अद्यापि सुरु झाली नसल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय
निमगाव वाघा ग्रामपंचायतच्या वतीने आगार प्रमुखांना निवेदन
अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरात येणार्या विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी नगर ते दैठणे गुंजाळ बस सेवा पुर्ववत सुरु करण्याच्या मागणीचे निवेदन निमगाव वाघा ग्रामपंचायत कार्यालयच्या वतीने ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे, सावली दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष बाबासाहेब महापुरे यांनी तारकपूर बस स्थानकचे आगार प्रमुख अभिजीत आघाव यांना देण्यात आले.
नेप्ती, मौजे निमगाव वाघा, पिंपळगाव वाघा, हिवरेबाजार, दैठणे गुंजाळ येथील शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी शिक्षणासाठी दररोज शहरात येत असतात. कोरोनानंतर शाळा व महाविद्यालय सुरळीत पूर्ववत सुरू झाले आहे. बस सेवा कोरोनाच्या टाळेबंदीनंतर बंद झालेली सदरची बस सेवा अद्यापि सुरु झाली नसल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. ज्येष्ठ नागरिक ग्रामस्थही शहरात कामानिमित्त येत असतात. कोरोनाचे प्रादुर्भाव कमी होऊन सर्व जनजीवन सुरळीत सुरु असून, विद्यार्थी व नागरिकांच्या सोयीसाठी त्वरीत सुरु करण्याची मागणी निमगाव वाघा ग्रामपंचायतच्या वतीने करण्यात आली आहे. निवेदनावर ग्रामविकास अधिकारी गोवर्धन राठोड, सरपंच रुपाली जाधव यांच्या स्वाक्षर्या आहेत.