• Mon. Jun 22nd, 2026

Mirrornews24

Marathi News

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे वृक्षरोपण अभियान

ByMirror

Oct 14, 2022

पर्यावरणाच्या प्रश्‍नामुळे सजीवृष्टीचे अस्तित्व धोक्यात -प्रा. माणिक विधाते

अहमदनगर (प्रतिनिधी)- राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने शहरात वृक्षरोपण अभियान राबविण्यात आले. राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते व युवकचे शहर जिल्हाध्यक्ष इंजि. केतन क्षीरसागर यांच्या हस्ते कल्याण रोड येथील संस्कृती श्रीनिवास कानोरे प्रशाळेत वृक्षरोपण करुन या अभियानाची सुरुवात करण्यात आली. यावेळी शालेय शिक्षण समितीचे चेअरमन जितेंद्र लांडगे, संचालक संजय सागांवकर, शिक्षक जगन्नाथ कांबळे, सुशिलकुमार आंधळे, राजेंद्र गर्जे, चंदा कार्ले, रूपाली जाधव, कल्पना भामरे, सौ. जरे, सारिका जाधव आदींसह शालेय विद्यार्थी उपस्थित होते.


प्रा. माणिक विधाते म्हणाले की, पर्यावरणाचे प्रश्‍न गंभीर बनत असताना, निसर्गाला शरण जाण्याची वेळ आली आहे. निसर्गाने मनुष्याला भरभरून दिले मात्र मनुष्याने स्वत:च्या हितासाठी निसर्गाची मोठी हानी केली. पुढील पिढीच्या भवितव्यासाठी आपल्या मुलाप्रमाणे झाडे लावून ती वाढवण्याची गरज आहे. पर्यावरणाच्या प्रश्‍नामुळे सजीवृष्टीचे अस्तित्व धोक्यात आले असून, भविष्यातील धोके टाळण्यासाठी वृक्षरोपण व संवर्धन हा एकमेव पर्याय असल्याचे त्यांनी सांगितले.


राष्ट्रवादी युवकचे शहर जिल्हाध्यक्ष इंजि. केतन क्षीरसागर यांनी राजकारण बाजूला ठेऊन सामाजिक भावनेने वृक्षरोपणाचा अभियान राबविण्यात आला आहे. राष्ट्रवादी युवकचे पदाधिकारी व कार्यकर्ते या अभियानात योगदान देत आहे. शहर हरित व सुंदर करण्याचा मानस असून, यामुळे पर्यावरणाचे प्रश्‍न सुटण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या या उपक्रमात विविध प्रजातीचे झाडे लावण्यात आली. शालेय शिक्षक व विद्यार्थ्यांनी लावलेल्या झाडांच्या संवर्धनाची जबाबदारी स्विकारली.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *