महाराष्ट्र राज्य वाहतूक सेना व विद्यार्थी वाहतूक महासंघाच्या
नाशिक विभागीय अध्यक्षपदी संजय आव्हाड यांची नियुक्ती

अहमदनगर (प्रतिनिधी)- नुकतीच महाराष्ट्र राज्य वाहतूक सेना प्रमुख व अखिल महाराष्ट्र राज्य विद्यार्थी वाहतूक महासंघाचे अध्यक्ष उदय दळवी यांच्या प्रमुख उपस्थितीत अहमदनगर या ठिकाणी औरंगाबाद रोडवरील विश्रामगृह येथे रविवारी (दि.3 एप्रिल) शहरातील सर्व स्कूल बस चालक-मालकांची बैठक पार पडली. या बैठकीत महाराष्ट्र राज्य वाहतूक सेना व अखिल महाराष्ट्र राज्य विद्यार्थी वाहतूक महासंघाच्या नाशिक विभागीय अध्यक्षपदी संजय आव्हाड यांची नियुक्ती करण्यात आली. यावेळी महासंघाचे अध्यक्ष दळवी यांनी आव्हाड यांना नियुक्ती पत्र देऊन त्यांचा सत्कार केला. यावेळी महासंघाचे उपाध्यक्ष मनोज पावशे, महासचिव घनश्याम सांडीम, सचिव सिद्दीक शेख, प्रसिद्धी प्रमुख योगेश कांबळे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र दळवी आदी मान्यवर उपस्थित होते.
बैठकी दरम्यान कोरोना काळात स्कूल बस बंद होत्या. या काळातील शासनाने स्कूल बसचा कर माफ केला. याप्रमाणे स्कूल बसचा व्यवसाय कर माफ व्हावा, तसेच 8 वर्षापुढील स्कूल बसला पर्यावरण लागणारा कर माफ करावा, आणि स्पीड गर्व्हनर यासाठी लागणार्या पत्राची अट रद्द करण्यात यावी, या महत्त्वाच्या विषयांवर महासंघाचे अध्यक्ष दळवी यांनी यावेळी सर्व शहरातील स्कूल बस चालक मालक यांच्याशी चर्चा केली. महासंघात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. येणारे समस्या सोडविण्यासाठी संघटन महत्त्वाचे असते. यामुळे भविष्यात आपण सर्व सोबत येऊन समस्या सोडविण्यासाठी संघटना तत्पर राहणार असल्याची ग्वाही दळवी यांनी दिली.
महासंघाचे उपाध्यक्ष मनोज पावशे, महासचिव घनश्याम सांडीम, सचिव सिद्दीक शेख, अहमदनगर शिवसेनेचे राजेंद्र दळवी व संजय आव्हाड यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी बैठकीस अर्जुन ढोबळे, सुरेश विघ्ने, संदीप शिंदे, अशोक शेळके, कैलास सपकाळ, दिलीप गलांडे, सलीम शेख, नामदेव लांडे, सुभाष मेजर, राजेंद्र चौधरी, प्रकाश कोटकर आदिंसह नगर शहरातील स्कूल बस चालक मालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.