• Wed. Mar 26th, 2025

माहेरच्या अध्यक्षपदी रजनी ताठे यांची नियुक्ती

ByMirror

Apr 15, 2022

विविध सामाजिक संस्था प्रतिनिधींच्या वतीने गौरव

अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील सामाजिक कार्यकर्त्या रजनीताई ताठे यांची माहेर या महिलांच्या न्याय, हक्कावर काम करणारे व कौटुंबिक कलह सोडविणार्‍या संस्थेच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. माहेरची नुकतीच धर्मादाय आयुक्त कार्यालयात नोंदणी झाली असून, त्याचा नोंदणी क्रमांक 498 असा महिलांसाठी असणारे कायद्यासंबंधीचा नंबर प्राप्त झाला असल्याची माहिती ताठे यांनी दिली.
रजनी ताठे या मागील तीन दशकांपासून अहमदनगर जिल्ह्यात नवविवाहित महिलांचे कौटुंबिक समस्या, हुंडाबळी, कौटुंबिक कलह वाद, समुपदेशन, पुनर्वसन, अत्याचारित मुली-महिला आणि बेरोजगार महिलांसाठी स्वयंरोजगार प्रशिक्षण याबाबत कार्य करीत आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र पोलीस महिला दक्षता समिती, शांतता समिती, भरोसा सेल, जय असोसिएशन ऑफ एनजीओ महाराष्ट्र राज्य समवेत त्या कार्यरत आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील विधीज्ञ, सामाजिक संस्था यांच्याशी समन्वय साधून सेवानिवृत्तीनंतरही त्यांचे महिलांसाठी कार्य सुरू आहे.
जय युवा अकॅडमीचे अध्यक्ष अ‍ॅड. महेश शिंदे, रयतचे पोपट बनकर, आधारवड संस्थेच्या अ‍ॅड. अनिता दिघे, अकोल्यातील सप्तशृंगी आदिवासी संस्थेच्या मीना म्हसे, जीवन आधार अ‍ॅड. पुष्पा जेजुरकर, उडान फाउंडेशनच्या आरती शिंदे, सामाजिक कार्यकर्ते विजय भालसिंग, शाहीर कान्हू सुंबे यांनी रजनी ताठे यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांचा सत्कार केला.
रजनी ताठे म्हणाल्या की, प्रमाणिकपणे केलेले समाजकार्य आपल्याला समाधान देत असते. महिलांवरील अत्याचार कमी व्हावेत, मुलींच्या जन्माचे स्वागत कृतीतून व्हावे व महिलांचे कौटुंबिक समस्या सोडवणुकीसाठी माहेर संस्थेने जबाबदारी स्वीकारली आहे. आजपर्यंत 987 नवरा-बायको मधील वाद समुपदेशनाने सोडविण्यात आले असून, यामधील सर्व महिला सुखी संसार करीत आहे. लवकरच महिलांसाठी संस्थेच्या वतीने स्वयंरोजगार प्रशिक्षण केंद्र व समुपदेशन केंद्र सुरू करणार असल्याचे त्यांनी सांगितले. या निवडीबद्दल ताठे यांचे शिवशक्ती संस्था कर्जतच्या जयश्री कुलथे, नेवासा येथील अक्षय संस्थेचे व शरणपूर वृद्धाश्रमाचे रावसाहेब मगर, शेवगाव येथील उत्कर्ष संस्थेच्या नयना बनकर, पाथर्डीतील मानवसेवा प्रतिष्ठानचे प्रा. सुनील मतकर श्रीरामपूर येथील अपंग सामाजिक संस्थेचे संजय साळवे, संजरी फौंडेशनचे (पुणे) ईसा शेख, छावाचे रावसाहेब काळे, जनस्वराज्य संस्थेचे प्रशांत साळुंके आदी जिल्हाभरातील सामाजिक संस्थेच्या प्रतिनिधींनी अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *