• Fri. May 29th, 2026

विजय भालसिंग यांना राष्ट्रीय कार्य दर्पण सन्मान पुरस्कार जाहीर

ByMirror

May 29, 2026

मुंबईत होणार महाराष्ट्र लोक कल्याणकारी सेवा संस्थेच्या वतीने गौरव


निस्वार्थ सामाजिक कार्याची दखल

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- येथील सामाजिक कार्यकर्ते विजय भालसिंग यांना सामाजिक, धार्मिक व पर्यावरण क्षेत्रात सुरु असलेल्या निस्वार्थ कार्याबद्दल महाराष्ट्र लोक कल्याणकारी सेवा संस्थेच्या वतीने राष्ट्रीय कार्य दर्पण सन्मान पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.


शनिवार दि.13 जून रोजी मुंबई येथे राष्ट्रीय कार्य दर्पण गौरव संमेलन होणार आहे. या संमेलनात विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते भालसिंग यांना पुरस्काराने सन्मानित केले जाणार असल्याची माहिती संमेलनाचे आयोजक सलमा एन.खान यांनी दिली.
विजय भालसिंग सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक, निसर्ग व पर्यावरण क्षेत्रात गेल्या दोन दशकापासून योगदान देत आहेत. वाळकी (ता. नगर) येथील असलेले भालसिंग एसटी बॅकेची नोकरी सांभाळून निस्वार्थपणे योगदान देत असून, कोणत्याही प्रकारचे शासकीय अनुदान व वर्गणी न घेता स्वखर्चातून सामाजिक कार्य करत आहे. वृक्षरोपण व संवर्धनासाठी ते सातत्याने कार्य करत आहे.


उन्हाळ्यात पशु-पक्ष्यांना जगणे सुसह्य व्हावे म्हणून पाणवठे तयार करुन पाणी उपलब्ध करणे, विविध परिसरात पक्ष्यांसाठी झाडांवर धान्य व पाण्याची भांडी बसविणे, सर्वत्र वाढत चाललेल्या सिमेंटच्या जंगलामुळे पशु-पक्ष्यांचे अस्तित्व राहण्यासाठी नारळाच्या साली पासून कृत्रिमरीत्या पक्ष्यांसाठी बनवलेले घरटी बसविणे आदी निसर्ग व पर्यावरणपुरक उपक्रम ते सातत्याने राबवित आहेत. दरवर्षी आषाढी वारीला जाणाऱ्या वारकऱ्यांच्या दिंडीची सेवा करत आहे. तसेच वाळकी पंचक्रोशीतील विविध प्रश्‍नांवर आवाज उठवून ते सोडविण्यासाठी शासकीय स्तरावर देखील ते पाठपुरावा करत आहे. या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना राष्ट्रीय कार्य दर्पण सन्मान पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. भालसिंग यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *