आज लावलेली झाडे भावी पिढीचा भविष्याकाळ सुखद करणार -प्रा. माणिक विधाते
हॉस्पिटल मधील रुग्णांना फळ व बिस्किटांचे वाटप
अहमदनगर (प्रतिनिधी)- आज लावलेली झाडे भावी पिढीचा भविष्याकाळ सुखद करणार आहे. यासाठी झाडे किती लावली? यापेक्षा ती किती जगवली याला महत्त्व आहे. वाढते शहरीकरण व औद्योगीकरणाने मोठ्या प्रमाणात वृक्षांची कत्तल करण्यात आल्याने पर्यावरणाचे प्रश्न निर्माण झाले आहे. अवती-भोवती शोभेचे झाड लावणे निर्थक असून, पर्यावरणपुरक झाडे लावल्यास पर्यावरणाचा समतोल साधला जाणार असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते यांनी केले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापना दिनाचे औचित्य साधून आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली भिंगार राष्ट्रवादीच्या वतीने कॅन्टोमेंट हॉस्पिटलच्या आवारात वृक्षरोपण अभियान राबविण्यात आले. तर हॉस्पिटल मधील रुग्णांना फळ व बिस्किटांचे वाटप करण्यात आले. यावेळी प्रा. विधाते बोलत होते. प्रारंभी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी राष्ट्रवादीचे भिंगार शहराध्यक्ष संजय सपकाळ, युवकचे शहर उपाध्यक्ष अभिजीत सपकाळ, प्रदेश सचिव अशोक बाबर, भिंगार कॅन्टोमेंटचे माजी उपाध्यक्ष संभाजी भिंगारदिवे, दिपक बडदे, विशाल बेलपवार, प्राचार्य कैलास मोहिते, सर्वेश सपकाळ, संपत बेरड, विलास तोडमल, दिपक अमृत, काशिनाथ साळुंके, हॉस्पिटलच्या वैद्यकिय अधिकारी डॉ. गितांजली पवार, डॉ. सद्दम कच्ची, शशीकांत रायभान, भाऊसाहेब काळे, अनिल धाडगे, सुहास जगताप, मतिन ठाकरे, सुंदर पाटील, सदाशिव मांढरे, संदीप शिंगवी, सागर काबरा, विनोद खोत, दिपक लिपाणे, लहू कराळे, गणेश बोरुडे, गणेश शिंदे, सिध्दू बेरड, अरुण चव्हाण, डॉ. सिताबाई भिंगारदिवे, योगेश करांडे, किशोर भिंगारदिवे, सोपान साळवे, सुनिल ओहोळ आदी उपस्थित होते.
पुढे प्रा. विधाते म्हणाले की, वंचितांच्या सेवेतच जीवनाचे खरे समाधान आहे. राजकारणापेक्षा समाजकारणाला महत्त्व देऊन राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली विकास कामे सुरु असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
संजय सपकाळ म्हणाले की, वृक्षरोपणाने पर्यावरणाचे ढासाळलेले समतोल साधले जाणार आहे. उद्याच्या भविष्यासाठी वृक्षरोपण व संवर्धन काळाची गरज बनली असून, वृक्ष न जगविल्यास मनुष्यच मनुष्याच्या विनाशाला कारणीभूत ठरणार आहे. भौतिक संपत्तीपेशा मनाच्या श्रीमंतीने मनुष्य मोठा होतो. आमदार संग्राम जगताप यांनी समर्पित भावनेने शहर व उपनगरांचा केलेल्या विकासात्मक कायापालटमुळे शहर विकासाकडे झेप घेत आहे. भिंगारचे अनेक प्रश्न देखील त्यांच्या माध्यमातून सुटले आहे. त्यांचे शहरासाठी असलेले योगदान प्रेरणादायी असल्याचे ते म्हणाले.