कोरोनातून सावरत असताना शालेय खेळाडूंना प्रोत्साहन देण्याची गरज -पै. नाना डोंगरे
अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथील नवनाथ विद्यालयास स्व.पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था व श्री नवनाथ युवा मंडळाच्या वतीने क्रीडा साहित्य भेट देण्यात आले. डोंगरे संस्थेचे अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे यांनी शाळेचे क्रीडा शिक्षक चंद्रकांत पवार यांच्याकडे क्रीडा साहित्य सुपुर्द केले. यावेळी सेवानिवृत्त शिक्षक काशीनाथ पळसकर, दत्तात्रय जाधव, निळकंठ वाघमारे, उत्तम कांडेकर, मुख्याध्यापक किसन वाबळे, शुभांगी धामणे,मंदा साळवे, सुवर्णा जाधव, युवा मंडळाचे अध्यक्ष संदिप डोंगरे, सचिव प्रतिभा डोंगरे, तुकाराम खळदकर, लहानबा जाधव, खेळाडू विद्यार्थी प्रशांत फलके, प्रशांत जाधव, अभिजीत फलके, प्रणव कापसे, प्रतिक नाट आदी उपस्थित होते.
पै. नाना डोंगरे म्हणाले की, कोरोनामुळे खेळाडूंचे मोठे नुकसान झाले. दोन वर्षात कोणत्याही खेळाची मोठी स्पर्धा होऊ शकलेली नाही. जिल्ह्यात विविध खेळातील उत्कृष्ट खेळाडू पुढे येत असून, कोरोनातून सावरत असताना शालेय खेळाडूंना प्रोत्साहन देण्याची सध्या गरज आहे. या भावनेने शालेय खेळाडूंसाठी क्रीडा साहित्य देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. क्रीडा शिक्षक चंद्रकांत पवार यांनी शालेय खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी डोंगरे बहुद्देशीय संस्था व श्री नवनाथ युवा मंडळाचे नेहमीच सहकार्य लाभत असते. संस्थेचे कार्य युवकांसाठी प्रेरणादायी असल्याचे सांगून त्यांनी खेळाडूंना सराव करण्याचे आवाहन केले.