वाडियापार्कला राज्यस्तरीय छत्रपती शिवराय केसरी कुस्ती स्पर्धेचे आखाडा पूजन
अहमदनगर (प्रतिनिधी)- देशातील सर्वात भव्य कुस्ती स्पर्धा शहरात होत असून, महाराष्ट्र केसरी व त्यापेक्षाही मोठे मल्ल आखाड्यात उतरणार आहे. विजेत्या मल्लास सोन्याची अर्धा किलो गदासह विविध वजन गटात तब्बल 75 लाख रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे. युवकांसाठी ही स्पर्धा प्रेरणादायी व पर्वणी ठरणार असल्याचे प्रतिपादन माजी पालकमंत्री तथा कुस्ती स्पर्धेचे स्वागताध्यक्ष प्रा. राम शिंदे यांनी केले.
भारतीय जनता पार्टी, शिवसेना व अहमदनगर जिल्हा तालीम संघाच्या वतीने 21 ते 23 एप्रिल दरम्यान होणार्या राज्यस्तरीय छत्रपती शिवराय केसरी निमंत्रीत कुस्ती स्पर्धेचे आखाडा पूजन वाडियापार्क क्रीडा संकुल मध्ये माजी पालकमंत्री प्रा. शिंदे यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमासाठी पंडित दीनदयाळ पतसंस्थेचे चेअरमन वसंत लोढा, भाजपचे युवा नेते सुवेंद्र गांधी, डॉ.एस.एस. दिपक, शिवसेनेचे शहर प्रमुख दिलीप सातपुते, जिल्हा तालिम संघाचे अध्यक्ष वैभव लांडगे, भाजपचे जिल्हाध्यक्ष महेंद्र (भैय्या) गंधे, उत्तरचे जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे, माजी जिल्हाध्यक्ष प्रा. भानुदास बेरड, पै. श्याम लोंढे, अजय बोरा, पै. प्रताप चिंधे, अॅड. अभिषेक भगत, कुंडलिकराव गदादे, पै. विलास चव्हाण, महेश लोंढे, प्रशांत मुथा, अॅड. विवेक नाईक, माजी नगरसेवक सुनिल भिंगारे, नितीन शेलार, मदन आढाव, तालिम संघाचे खजिनदार पै. नाना डोंगरे, शहराध्यक्ष नामदेव लंगोटे, अजय अजबे, आनंद शेळके, युवा मोर्चाचे आशिष आनेचा, विक्रम बारवकर, संभाजी निकाळजे, बाळासाहेब शेंदूरकर, बाळासाहेब भुजबळ, राजू मंगलारप, मल्हारी दराडे, राहुल रासकर, बंटी ढापसे, सतीश शिंदे, रवी सुरवासे, ओंकार सातपुते, गोपाळ वर्मा आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना प्रा. शिंदे म्हणाले की, जिल्ह्यातील मल्ल व कुस्तीप्रेमींची अनेक दिवसापासून अशा पद्धतीने भव्य दिव्य कुस्ती स्पर्धा होण्याची इच्छा होती. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सर्वजण जबाबदारी पार पाडत आहे. मोबाईलच्या डिजिटल युगात मुळे मैदानात खेळतात का नाही? हा मोठा प्रश्न आहे. मात्र या स्पर्धेने मैदानी खेळाला चालना देण्याचे काम होणार आहे. आयोजक राजकीय पक्ष असले तरी सामाजिक दायित्व म्हणून कुस्ती स्पर्धा पार पाडण्यासाठी जिल्हा तालीम संघाच्या पाठीशी उभे राहिले आहेत. देशभर या स्पर्धेची चर्चा होणार आहे. या स्पर्धेसाठी विविध खात्याचे मंत्री शहरात येणार असून, शहराच्या सर्वांगीण विकासासाठी येणार्या मंत्र्यांकडून काहीतरी निर्णय व्हावेत या अपेक्षेने शहराच्या निगडित प्रश्नांवर संबंधित खात्याची बैठक घेण्याचा मानस आहे. कुस्ती खेळाला चालना देताना, शहर विकासासाठी देखील योगदान देण्याचे काम केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. उपस्थित प्रमुख पदाधिकार्यांनी आपल्या भाषणात कुस्तीची माहिती दिली.

प्रारंभी वाडियापार्क क्रीडा संकुलमध्ये तयार करण्यात आलेल्या लाल मातीच्या आखाड्यात हनुमानजींची प्रतिमा पूजन करुन लाल मातीत हळद व तेल टाकण्यात आले. डॉ. एस.एस. दीपक यांनी दरवर्षी शहरात अशा पद्धतीने भव्य कुस्ती स्पर्धा होण्याची अपेक्षा व्यक्त करुन सहकार्याची भावना व्यक्त केली. यावेळी भाजप, शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच जिल्हा तालीम संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.