• Sun. Jun 21st, 2026

Mirrornews24

Marathi News

दादासाहेब रूपवते विद्यालयाच्या संरक्षक भिंतीच्या कामाचे भूमिपूजन

ByMirror

Jul 5, 2023

विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनाने शाळेला संरक्षक भिंतीची गरज -अ‍ॅड. धनंजय जाधव

अहमदनगर (प्रतिनिधी)- बहुजन शिक्षण संघ संचलित तोफखाना येथील दादासाहेब रूपवते विद्यालय व ज्युनिअर कॉलेजच्या पडलेल्या संरक्षक भिंतीच्या कामाचे भूमिपूजन माजी विरोधी पक्षनेते संजय शेंडगे यांच्या हस्ते झाले. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनाने महापौर रोहिणीताई शेंडगे यांच्या निधीतून या शाळेच्या संरक्षक भिंतीचे काम मार्गी लावण्यात आले.


या भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी राजूमामा जाधव, नगरसेवक श्याम नलकांडे, संजय ढोणे, प्रदीप परदेशी, अ‍ॅड. धनंजय जाधव, मनपा शिक्षण मंडळाचे प्रशासनाधिकारी जुबेर पठाण, संस्थेचे रजिस्टार प्रा.व्ही.एम. बैचे, प्राचार्य प्रा.एम.के. शेख, उपप्राचार्य प्रा. राहुल खंडिझोड, पर्यवेक्षक प्रा. जयंत गायकवाड, प्रा. प्रमोद सूर्यवंशी, प्रा. सोपान कदम, प्रा. यादव, प्रा. श्रीकांत पाखरे, मनपा शिक्षण विभागाचे पालवे, झाडे मॅडम, प्रा. किरण इंगळे, प्रा. सय्यद, बबन कसाब, संदीप सदाफुले आदींसह शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी उपस्थित होते.


प्रा. जयंत गायकवाड यांनी प्रास्ताविकात नुकतीच शाळा सुरु झाली असून, तोफखाना येथील वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या दादासाहेब रूपवते विद्यालयास संरक्षक भिंत नसल्याने मोठी अडचण निर्माण होत होती. लहान विद्यार्थी खेळत असताना रस्त्यावर जावू नाये, यासाठी विशेष लक्ष द्यावे लागत होते. मात्र विद्यार्थ्यांसाठी तातडीने संरक्षक भिंतीचा प्रश्‍न मार्गी लावल्याबद्दल संस्थेच्या वतीने त्यांनी महापौरांचे आभार मानले.


अ‍ॅड. धनंजय जाधव म्हणाले की, दादासाहेब रूपवते विद्यालयात तोफखाना परिसर व इतर भागातील सर्वसामान्य कुटुंबातील मुले शिक्षण घेत आहे. शाळा रस्त्यालगत असल्याने लहान मुलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनाने शाळेला संरक्षक भिंतीची नितांत गरज भासत होती. शाळेकडून झालेल्या पाठपुराव्याने हा प्रश्‍न तात्काळ मार्गी लावण्यात आलेला आहे. तसेच मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करुन शाळेच्या वर्ग खोलीच्या बांधकामाचे प्रश्‍न सोडविणार असल्याचे त्यांनी सांगितले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *