शिक्षणाधिकारी यांनी केला गुणवंत विद्यार्थिनी बोडखे हिचा सत्कार
सीबीएसई बोर्डाच्या दहावीच्या परीक्षेत मिळवले 94 टक्के गुण
अहमदनगर (प्रतिनिधी)- सीबीएसईच्या दहावी बोर्डात प्रणिता बोडखेला मिळालेले गुण कौतुकास्पद असल्याची भावना जिल्हा परिषद माध्यमिकचे शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांनी व्यक्त केली. तर पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
सीबीएसई बोर्डाच्या इयत्ता दहावीच्या परीक्षेत 94 टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या प्रणिता साहेबा बोडखे या विद्यार्थिनीचा सत्कार शिक्षणाधिकारी कडूस यांनी केला. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी शिक्षक परिषदेचे नेते बाबासाहेब बोडखे, महानगर मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष ज्ञानदेव बेरड, सचिव प्रा. बाबासाहेब शिंदे, सोहेल शेख, किशोर अहिरे, साहेबा बोडखे, मीनाक्षी बोडखे, शिक्षक परिषदेचे जिल्हा कार्याध्यक्ष बबन शिंदे, अशोक पवार, आर.एम. टापरे, एस.डी. भालेराव, बी.व्ही म्हस्के, आर.व्ही. धात्रक, ज्ञानेश्वर शिंदे आदी उपस्थित होते.
बाबासाहेब बोडखे यांनी शिक्षणाशिवाय पर्याय नसून, विद्यार्थ्यांनी उज्वल भवितव्य घडविण्यासाठी गुणवत्ता सिध्द करावी. स्पर्धेच्या युगात आपले अस्तित्व सिध्द करण्यासाठी ध्येय ठरवून त्या दिशेने वाटचाल केल्यास यश मिळणार असल्याचे सांगितले. तर शिक्षक परिषदेच्या वतीने प्रणिता या विद्यार्थिनीस शुभेच्छा दिल्या.
प्रणिता बोडखे ही केंद्रीय विद्यालय (शाळा नं.1) ची विद्यार्थीनी असून, तिने सन2021-22 मध्ये झालेल्या सीबीएसईच्या इयत्ता दहावीच्या परीक्षेत यश संपादन करुन शाळेत दुसरी येण्याचा मान पटकाविला आहे. तिचे वडिल साहेबा बोडखे सिताराम सारडा विद्यालयात सहशिक्षक तर आई मीनाक्षी बोडखे या देवळाली प्रवरा (ता. राहुरी) जिल्हा परिषद शाळेत शिक्षिका आहेत. प्रणिता बोडखे हिची आयआयटी इंजिनीयर होण्याची इच्छा असून, या दिशेने तिने वाटचाल सुरु केली आहे. तिच्या पुढील शिक्षण व भवितव्यासाठी उपस्थितांनी शुभेच्छा दिल्या.
