गरिबीमुळे कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये -डॉ. पी.ए. इनामदार
अहमदनगर (प्रतिनिधी)- गरिबीमुळे कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये. गरिबीतून आलेल्या अनेकांनी आपले कर्तृत्वसिध्द करुन समाजाला दिशा दिली आहे. सर्वसामान्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी सर्वतोपरीने मदत करणार असल्याचे प्रतिपादन एम.सी.ई. सोसायटी (पुणे) चे अध्यक्ष डॉ. पी.ए. इनामदार यांनी केले.
तपोवन रोड, गुरुकुल कॅम्पस येथे एकता एज्युकेशन अॅण्ड वेल्फेअर सोसायटीच्या डॉ. पी.ए. इनामदार प्राथमिक व माध्यमिक विद्यालय नामकरण सोहळा व नूतन इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी डॉ. इनामदार बोलत होते. आमदार संग्राम जगताप यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमासाठी शिक्षण संचालक दिनकर टेमकर, एससीईआरटीचे सहसंचालक रमाकांत काठमोरे, युवा नेते अक्षय कर्डिले, एस.ए.इनामदार,संस्थेचे अध्यक्ष एन.ए. पठाण, शाळा समितीचे चेअरमन अनिल साळुंके, अलीम हुंडेकरी, अफजल कादर खान, नगरसेवक सुनील त्र्यंबके, विशाल सूर्यवंशी, गणेश गरड, देविदास डहाळे, समीर पठाण, प्राचार्य सुनील पंडित, प्राचार्य बाळकृष्ण कडुस, प्राचार्य शुभम टेमकर, मुख्याध्यापिका कुंदा झोंड, प्राचार्या मृगाक्षी घोष, मेजर शिवाजी पालवे, सलाम सर, इंजि.अन्वर शेख, इंजि. इकबाल शेख, रहीम खोकर, अॅड. फारुक शेख, मेजर शिवाजी गर्जे, संतोष चौरे, विठ्ठल लोखंडे, एजाज शेख, सिराज सर, सिंधुताई गरड, परवीन शेख, अर्चना पटवा आदी उपस्थित होते.
आमदार संग्राम जगताप म्हणाले की, ज्ञान मंदिरातून परिवर्तनाची क्रांती घडणार आहे. यासाठी सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहात येण्याची गरज आहे. शहराची झपाट्याने वाढ होत असताना उभे राहिलेले हे शैक्षणिक संकुल सर्वसामान्यांचे जीवनमान व परिस्थिती बदलण्याची नांदी ठरणार आहे. सर्वसामान्य घटकातील नागरिकांची गरज ओळखून संस्थेने उभे केलेल्या शैक्षणिक संकुलाचे त्यांनी कौतुक केले. शिक्षण संचालक दिनकर टेमकर यांनी विद्यालयाच्या रोपट्याचे वटवृक्षात रुपांतर झाले असून, सर्वसामान्यांना दर्जेदार शिक्षण या शाळेच्या माध्यमातून मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. रमाकांत काठमोरे यांनी शाळेच्या भौतिक सुविधांचा फायदा विद्यार्थ्यांना होत असून, विद्यार्थ्यांची गुणवत्ता देखील वाढणार असल्याचे स्पष्ट केले. संस्थेचे अध्यक्ष एन. ए. पठाण यांनी शाळेला इमारत व विद्यार्थ्यांना सर्व सुविधा उपलब्ध करुन दिल्याबद्दल डॉ. इनामदार यांचे विशेष आभार मानले.
प्रास्ताविकात शाळा समितीचे चेअरमन अनिल साळुंके यांनी शाळेचा आजवरचा प्रवास उलगडला. तर विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी सुरु असलेल्या उपक्रमाची माहिती दिली. यावेळी विद्यालयाच्या पुस्तकाचे प्रकाशन पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सबा शेख व दिप्ती कराळे यांनी केले. आभार मुख्याध्यापिका कुंदा झोंड यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिल्पा शिंदे, शितल कडूस, प्रियंका बोरुडे, अमोल निमसे, अभिजीत गवारे, फातिमा शेख, दानिश इनामदार, आसिफ पठाण, सलमान पठाण, परवेज शेख, साबेर पठाण,प्रियंका शिरसाठ, प्रियंका जयस्वाल,कोरी मॅडम, बागवान मॅडम, विमल पोतफुले, ज्योती मुर्तडकर, अशोक कुर्हाडे यांनी परिश्रम घेतले.