• Tue. Jul 14th, 2026

Mirrornews24

Marathi News

जिल्ह्यातून मक्का-मदिना (उमरा) धार्मिक यात्रेला जाण्यासाठी भाविकांचे जथ्थे सज्ज

ByMirror

Dec 21, 2022

धार्मिक यात्रेच्या विधीचे भाविकांना मार्गदर्शन

उम्मत इंटरनॅशनल हज-उमराचा उपक्रम

अहमदनगर (प्रतिनिधी)- शहर व जिल्ह्यातून मक्का-मदिना (उमरा) धार्मिक यात्रेला जाण्यासाठी भाविकांचे जथ्थे सज्ज होत आहे. या यात्रेत सहभागी होणार्‍या भाविकांसाठी शहरात प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. तीन टप्प्यात मक्का-मदिना (उमरा) यात्रेत रवाना होणार्‍या भाविकांना धार्मिक विधी, स्थानिक शहराची माहिती व यात्रेबद्दल सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.


मुकुंदनगर येथील इरिगेशन मस्जिद येथे उम्मत इंटरनॅशनल हज-उमरा सर्व्हिसेसच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. तीन टप्प्यात 112 व्यक्ती मक्का-मदिना (उमरा) यात्रेला जात आहेत. या भाविकांना मौलाना शफिक कासमी यांनी उमराह करण्याची विधीबद्दल माहिती सांगितली.


कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर देशातील मुस्लिम भाविकांना तब्बल दोन वर्षापासून मक्का-मदिना (उमरा) यात्रेला जाता आले नव्हते. या धार्मिक यात्रा निर्बंधमुक्त झाल्याने मुस्लिम भाविकांचा धार्मिक यात्रेसाठी ओढा वाढला आहे. मोठ्या संख्येने भाविक जाण्याच्या तयारीत आहे. ग्रुपचे संचालक अस्लम शेख स्वतः भाविकांना मार्गदर्शनासाठी या यात्रेत सहभागी होणार आहे. 2016 पासून उम्मत इंटरनॅशनल हज-उमरा सर्व्हिसेस सेवा देत असल्याची माहिती कासमी यांनी दिली.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *