धार्मिक कार्याला सामाजिक कार्याची जोड देऊन महिलांच्या सक्षमीकरणासाठी कार्य करणार -हिराबाई मोकाटे
अहमदनगर (प्रतिनिधी)- जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनच्या महिला जिल्हाध्यक्षपदी महिला किर्तनकार ह.भ.प. हिराबाई बाळू मोकाटे यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांच्या सामाजिक व धार्मिक कार्याची दखल घेऊन त्यांच्या नियुक्तीची घोषणा करण्यात आली आहे.
जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष तथा माजी तहसीलदा वाल्मीक महाराज जाधव व नाशिकचे जिल्हा अध्यक्ष डॉ. जनार्दन पगार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकित मोकाटे यांची नियुक्ती करुन त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. धार्मिक कार्याला सामाजिक कार्याची जोड देऊन विविध उपक्रम राबवून महिलांच्या सक्षमीकरणासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याची भावना हिराबाई मोकाटे यांनी व्यक्त केली. या निवडीबद्दल सामाजिक कार्यकर्ते विजय भालसिंग, वारकरी मंडळी व फेडरेशनच्या पदाधिकार्यांनी त्यांचे अभिनंदन केले.
