विविध प्रकारचे ब्रॅण्डेड लेदरचे शूज, सॅन्डल, पर्स, बेल्ट व बॅग उपलब्ध
अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील किंग्ज गेट रोड येथील गोल्डन लेदर या नवीन दालनाचा शुभारंभ हज्जन आरेफा अल्ताफ शेख यांच्या हस्ते झाला. यावेळी संचालक जुनेद अल्ताफ शेख, शेख मुश्ताक हाजी इब्राहिम, हाजी शकिल इब्राहिम, हाजी सय्यद फकिर मोहंमद, नविद अल्ताफ शेख, हाजी शेख जावेद अल्ताफ, शाहिद अल्ताफ शेख, अजिम अल्ताफ शेख आदी उपस्थित होते.
जुनेद अल्ताफ शेख म्हणाले की, ब्रॅण्डेड लेदरच्या वस्तूंसाठी शहरातील नागरिकांना मोठ्या शहरात जावे लागत होते. गोल्डन लेदर मध्ये विविध प्रकारचे ब्रॅण्डेड लेदरचे शूज, सॅन्डल, पर्स, बेल्ट व बॅग ग्राहकांना योग्य दरात मिळणार आहे. शहरात ब्रॅण्डेड लेदरचे वस्तू वापरणारा एक मोठा ग्राहक वर्ग असून, त्यांना या सुविधेचा लाभ मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.

गोल्डन लेदर या नवीन दालनास नगरसेवक हाजी नजीर अहमद उर्फ नज्जू पैलवान, स्थायी समितीचे माजी सभापती अविनाश घुले, हाजी मन्सूर शेख, मुजाहिद (भा) कुरेशी, नगरसेवक मुदस्सर शेख, सचिन जाधव यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या.