• Wed. Jan 22nd, 2025

एक तास राष्ट्रवादीसाठी उपक्रमातंर्गत बोल्हेगावला बैठक

ByMirror

Apr 3, 2022

कार्यकर्ते व पदाधिकारी पक्षाच्या इमारतीचा मजबूत पाया -कुमारसिंह वाकळे

अहमदनगर (प्रतिनिधी)- शहराच्या विकासाबरोबर बोल्हेगाव उपनगराचा विकास राष्ट्रवादीच्या माध्यमातून आमदार संग्राम जगताप यांनी साधला. नागरिकांच्या जिव्हाळ्याचे व मुलभूत प्रश्‍न सोडविण्याचे काम करण्यात आले. पक्षाच्या ध्येय धोरणाने विकासात्मक व्हिजन घेऊन आमदार व राष्ट्रवादीचे नगरसेवक शहरात कार्यरत आहे. लोकसेवेसाठी झटणार्‍या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमुळे पक्ष बळकट झाला असून, कार्यकर्ते व पदाधिकारी पक्षाच्या इमारतीचा मजबूत पाया असल्याचे प्रतिपादन मनपा स्थायी समितीचे सभापती कुमारसिंह वाकळे यांनी केले.
एक तास राष्ट्रवादीसाठी, आगामी महाराष्ट्राच्या विकासासाठी या उपक्रमांतर्गत बोल्हेगाव, प्रभाग क्रमांक 7 मध्ये राम मंदिर येथे पक्षाचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी यांच्या उपस्थितीमध्ये संवाद कार्यक्रम घेण्यात आला. राष्ट्रवादीच्या वतीने महिन्याच्या प्रत्येक शनिवारी बैठक घेऊन पक्षाचे पुरोगामी विचार, ध्येय-धोरण जनसामान्यांपर्यंत पोहचविण्यासाठी व सद्य राजकीय परिस्थितीबाबत चर्चा करण्यासाठी एक तास राष्ट्रवादीसाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमातंर्गत राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीप्रसंगी ओबीसी शहर सरचिटणीस राजेंद्र कापरे, मोहन पडोळे, दशरथ वाकळे, भिवसेन महाराज कोलते, ज्ञानदेव कापडे, मनोज आंबेकर, निखील खामकर आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.


पुढे वाकळे म्हणाले की, बोल्हेगावचा परिसर मोठा असून, काही विकासकामे प्रलंबीत आहे. यासाठी पक्षाने नगरसेवकांना भरीव निधी उपलब्ध करुन देण्याची तरतूद करावी. पक्षाच्या विचारधारेने प्रभागात कार्य सुरू आहे. नगरसेवक व मतदार यांमधील अंतर कमी करुन जनतेशी एकरुप होऊन विकासकामे करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. तर लोकसभा व विधानसभेत बोल्हेगाव येथून राष्ट्रवादी पक्षाला सर्वाधिक मते मिळाली. शहराध्यक्ष म्हणून काम करताना प्रा. विधाते यांनी सर्वांच्या मनात मोठा विश्‍वास निर्माण करुन कार्यकर्ते जोडण्याचे काम केले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
प्रा. माणिक विधाते म्हणाले की, पक्षात काम करत असताना प्रत्येक कार्यकर्त्याने कर्तव्यनिष्ठेने योगदान द्यावे. युवकांना पक्षात काम करण्यास मोठी संधी आहे. राजकारणापेक्षा समाजकारणला महत्त्व देऊन पक्षाची वाटचाल सुरु असून, या भावनेने आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात कार्य सुरु आहे. प्रभाग 7 चे नगरसेवक कुमारसिंह वाकळे यांनी मोठ्या प्रमाणात विकासकामे मार्गी लावून प्रभागाचे रुप पालटले असल्याचे सांगितले. या बैठकीसाठी अभिजीत म्हस्के, गोरख खाडे, आबासाहेब शिंदे, मोहन गाडे, रोहिदास आंबेकर, राहुल हराळे, तुकाराम वाबळे, ऋषीकेश कराळे, कुन्दन कुमार, जीवन पगार, निवृत्ती उंडे, मुकुंद बोरुडे, भरत थोरात, हरुन शेख, शरद महापूरे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पंकज वाकळे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *