लोककल्याणासाठी शाहू, फुले, आंबेडकर ही एक विचारधारा -प्रा. नवनाथ वाव्हळ
अहमदनगर (प्रतिनिधी)- ऋषीं मधील त्यागी वृत्तीचा राजा म्हणजे राजर्षी व लोकांच्या कल्याणासाठी सर्व काही कार्य करणारा लोकराजा या उपाधीने शाहू महाराजांनी आपले असतित्व निर्माण केले. ब्रिटीशकाळातील पहिला समाजसुधारक राजा ज्याने आपला पैसा थेट जनतेवर खर्च केला. शिक्षणाची दूरदृष्टी ठेवून प्राथमिक शिक्षण सक्तीचे केले. त्यांच्या रुपाने समाजात लोककल्याणासाठी शाहू, फुले, आंबेडकर ही एक विचारधारा उदयास आली. या विचारधारेने राष्ट्रवादीचे कार्य लोककल्याणासाठी सुरु असल्याचे प्रतिपादन इतिहास संशोधक प्रा. नवनाथ वाव्हळ यांनी केले.

एक तास राष्ट्रवादीसाठी, आगामी महाराष्ट्राच्या विकासासाठी या उपक्रमांतर्गत प्रेमदान हडको, प्रभाग क्रमांक 5 मध्ये दक्षीणमुखी पावन हनुमान मंदिर येथे पक्षाचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व नागरिकांच्या उपस्थितीमध्ये संवाद कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्यावर आयोजित व्याख्यानात प्रा. वाव्हळ बोलत होते. याप्रसंगी राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते, नाभिक समाज संघटनेचे अध्यक्ष नंदकुमार मोरे, ओबीसी सेलचे शहर जिल्हाध्यक्ष अमित खामकर, कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष गजानन भांडवलकर, क्रीडा सेलचे घनश्याम सानप, उद्योजक तथा मढी देवस्थानचे विश्वस्त अॅड. शिवजीत डोके, बाळासाहेब पानसरे, राष्ट्रवादी महिला उपाध्यक्षा शोभाताई भिंगारदिवे, अंबिका भिसे, वाल्हेकर ताई, हडको सोसायटीचे चेअरमन गोरडे, राष्ट्रवादी विभाग प्रमुख सतीश मुंडलिक, विलास शिंदे, पोलीस बॉईज असोसिएशनचे नितीन खंडागळे, बाळू खताडे, बाळासाहेब पानसरे आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
पुढे प्रा. वाव्हळ म्हणाले की, कोल्हापूर संस्थांनधील महसूल गोळा करून शाहू महाराजांनी तो खर्च लोक कल्याणासाठी केला. बोर्डिंग ही संकल्पना शाहूमहाराजांनी अस्तित्वात आणली. बहुजन समाजाला शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी हा वारसा पुढे चालवल्याचे त्यांनी सांगितले. तर शाहू महाराजांचा अहमदनगर शहराशी आलेला संबंध यावर इतिहासाचे दाखले देत त्यांनी सविस्तर माहिती दिली.

प्रा. माणिक विधाते म्हणाले की, समाजात जातीय द्वेष पसरविण्याचे कार्य काही समाजकंटक व राजकीय पुढारी करत आहे. मात्र शाहू, फुले, आंबेडकर या विचारधारेने प्रेरित झालेल्या महाराष्ट्रात बंधुभाव टिकून आहे. राष्ट्रवादी जातीयवादी प्रवृत्तीच्य विरोधात असून, समाजातील समता, बंधुतेसाठी कार्य करत आहे. पक्षाची विचारधारा जनते पर्यंत पोहचविण्यासाठी एक तास राष्ट्रवादीसाठी हा उपक्रम सुरु आहे. आमदार संग्राम जगताप यांच्या माध्यमातून शहराची प्रगतीपथाकडे वाटचाल सुरु आहे. शहराचा सर्वांगीन विकास केला जात असताना, सुरु असलेल्या विकास कार्याची माहिती देखील जनतेला या उपक्रमाद्वारे दिली जात असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन घनश्याम सानप यांनी केले. आभार अमित खामकर यांनी मानले. या कार्यक्रमासाठी सचिन तुपे, शुभम भगत, शेखर भिसे, कुणाल पोटे, ओंकार फिरोदे, विजय नामदे, अक्षय मारवाडे, असिम खान, मनोज चौरे, सागर चवंडके, कमलेश वाव्हळ, राम खांडवे, राकेश पाटील, अक्षय अष्टेकर, अतुल खामकर, निलेश खताडे, सचिन लोखंडे, अनिकेत येमुल, अभिजित ढाकणे, सचिन शिंदे आदींसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मा.संपादक कृपया प्रसिध्दीसाठी……………….