• Thu. Jan 16th, 2025

अहमदनगरमध्ये उत्साहात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

ByMirror

Apr 14, 2022

जयभिमच्या गजराने शहर दुमदुमले


अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरात राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतीनिमित्त मोठा उत्साह पहायला मिळाला. यावेळी बाबासाहेबांच्या मार्केटयार्ड चौकातील पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी भिम अनुयायींची मोठी गर्दी जमली होती. तसेच चौका-चौकात बाबासाहेबांच्या पुतळ्याभोवती आकर्षक सजावट करुन अभिवादन करण्यात आले.


सकाळी मार्केटयार्ड चौकातील बाबासाहेबांच्या पुतळ्यासमोर भिमवंदना होऊन अभिवादन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, आमदार संग्राम जगताप, जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, महापौर रोहिणी शेंडगे, आयुक्त शंकर गोरे आदींसह विविध राजकीय, सामाजिक संघटनेचे पदाधिकारी, भिम अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच बाबासाहेबांच्या अभिवादनासाठी विविध वेशभुषेत चिमुकले अभिवादनासाठी आले होते.

रेल्वे स्टेशन शिवनेरी चौक येथील संकल्प प्रतिष्ठान व विजय गव्हाळे मित्र मंडळाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला आकर्षक विद्युत रोषणाई व सजावट
रेल्वे स्टेशन शिवनेरी चौक येथील संकल्प प्रतिष्ठान व विजय गव्हाणे मित्र मंडळाच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 331 व्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करताना आमदार संग्राम जगताप उपमहापौर गणेश भोसले, मा.नगरसेवक विजय गव्हाळे, नगरसेवक प्रकाश भागानगरे, संजय चोपडा, दत्ता खैरे, अशोक गायकवाड, परिमल निकम, संभाजी पवार, सुरेश बनसोडे, रंजनाताई उकिरडे, महेश सुपेकर, गौरव गव्हाळे, मिलिंद जाधव, भाऊ चौधरी, नंदू लांडगे, संजय जरबंडी, चंदू औषीकर, अनिकेत आगरकर, रावसाहेब दळवी, सोमा रोकडे, दीपक लोंढे, शरद दळवी, वैभव दळवी, शुभम लांडगे, सुमित जाधव, नरसाळे सर, अभी गायकवाड आदी उपस्थित होते.
महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतीनिमित्त मार्केटयार्ड येथील पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करताना वंचित बहुजन आघाडीचे युवक नेते विनोद सुधाकर गायकवाड, मनिषा गायकवाड शेलार पाटील, सुनील शिंदे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतीनिमित्त मार्केटयार्ड येथील पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करताना वंचित बहुजन आघाडीचे युवक नेते विनोद सुधाकर गायकवाड, मनिषा गायकवाड शेलार पाटील, सुनील शिंदे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतीनिमित्त इंपिरियल चौक माळीवाडा येथे अरुण काका मित्र मंडळ, पै.अफजल भाई फ्रेंड सर्कल, एकता मित्र मंडळ व संकल्प युवा प्रतिष्ठान च्या वतीने बाबासाहेबांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करताना आमदार संग्राम जगताप समवेत उद्योजक पै.अफजल शेख, अशोक गायकवाड, सुनील कोतकर, परिमल निकम, पै. असलम शेख, सुरेश बनसोडे, पै गणेश साळवे, योगेश थोरात, निखिल शिंदे, सोहेल शेख, वाहिद कुरेशी, परवेज शेख, आकाश औटी, वाहिद शेख, आकाश शिरसाट, शुभम साळवे, विकी थोरात, किरण चंदनशिव, फरान शेख, वसीम शेख, नीलू शेत्रे, जय शिंदे, सागर ठोकळ, शुभम बडेकर, अजर शेख आदी उपस्थित होते.

नगर कल्याण रोड वरील साईराम सामाजिक सोसायटी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज व क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करताना तोफखाना पोलीस स्टेशनचे पी.आय.ज्योती गडकरी समवेत सहाय्यक निरीक्षक रणदिवे, नगरसेवक श्यामभाऊ नळकांडे, सचिन शिंदे, सोसायटीचे अध्यक्ष सुनील शिंदे, दत्ता पारखे, श्रीपाद वाघमारे, सोमनाथ बोऱ्हाडे, दिनेश शिंदे, राजू पंचमुख, शंकर बोरुडे, चंद्रकांत भोसले, मल्हारी ओव्हाळ आदीसह सोसायटीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतीनिमित्त इंपिरियल चौक माळीवाडा येथे अरुण काका मित्र मंडळ, पै.अफजल भाई फ्रेंड सर्कल, एकता मित्र मंडळ व संकल्प युवा प्रतिष्ठान च्या वतीने सरबत वाटप करताना आमदार संग्राम जगताप समवेत उद्योजक पै.अफजल शेख, अशोक गायकवाड, सुनील कोतकर, परिमल निकम, पै. असलम शेख, सुरेश बनसोडे, पै गणेश साळवे, योगेश थोरात, निखिल शिंदे, सोहेल शेख, फिरोज कुरेशी, परवेज शेख, आकाश औटी, वाहिद शेख, आकाश शिरसाट, शुभम साळवे, विकी थोरात, किरण चंदनशिव, फरान शेख, वसीम शेख, नीलू शेत्रे, जय शिंदे, सागर ठोकळ, शुभम बडेकर, अजर शेख आदी उपस्थित होते.

माळीवाडा येथील किरण चाबुकस्वार मित्र मंडळाच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे 331 व्या जयंतीनिमित्त मिष्टान्न भोजनाचे वाटप करताना सिकंदर मामू, किरण चाबुकस्वार, जाकिर पठाण (वडाला), धर्मा चाबुकस्वार,  प्रा.भीमराव पगारे, राजू शेख, नितीन कसबेकर, महेश भोसले, जितु शिरसाट, बंडू आव्हाड, करण चाबुकस्वार, अर्जुन चाबुकस्वार, रमेश साळवे, सुभाष सोनवणे, बाळासाहेब पवार, नेटके पाटील, पप्पू शेठ, पंडित सर आदी उपस्थित होते.
वीरशैव कक्कय्या ढोर समाज विकास मंडळाच्या वतीने राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतीनिमित्त मार्केटयार्ड चौकातील त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करताना संस्थेचे अध्यक्ष रमेश त्रिमुखे, उपाध्यक्ष बाबासाहेब त्रिंबके, गणेश नारायणे, प्रशांत डहाके, गंगाधर त्र्यंबके आदी. 
राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतीनिमित्त मार्केटयार्ड चौकातील त्यांच्या पुतळ्यास कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाच्या वतीने पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी कास्ट्राईबचे राज्याध्यक्ष एन.एम. पवळे, कार्याध्यक्ष वसंत थोरात, महिला जिल्हाध्यक्षा मंदाताई भिंगारदिवे, शहर अभियंता सुरेश इथापे, रोहिदास सातपुते, अ‍ॅड. सिध्दार्थ वाघमारे आदी.
महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतीनिमित्त इंपिरियल चौक माळीवाडा येथे अरुण काका मित्र मंडळ, पै.अफजल भाई फ्रेंड सर्कल, एकता मित्र मंडळ व संकल्प युवा प्रतिष्ठान च्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून  सरबत वाटप करताना युवा नेते अक्षय कर्डिले समवेत उद्योजक पै.अफजल शेख, पै. असलम शेख, सोहेल शेख, फिरोझ कुरेशी, परवेज शेख, आकाश औटी, वाहिद बिल्डर, आकाश शिरसाट, शुभम साळवे, विकी थोरात, किरण चंदनशिव, फरान शेख, वसीम शेख, नीलू शेत्रे, जय शिंदे, सागर ठोकळ, शुभम बडेकर, अजर शेख आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *