• Mon. Jun 22nd, 2026

Mirrornews24

Marathi News

अंजूमने तरक्की उर्दू ट्रस्ट संचलित चाँद सुलताना उर्दू हायस्कूलच्या चेअरमनपदी अर्शद शेख

ByMirror

Oct 10, 2022

नव्याने संचालक मंडळ जाहीर

मागील इतिहास बाजूला ठेवून, संस्थेच्या उज्वल भविष्यासाठी पुढील वाटचाल -अर्शद शेख

अहमदनगर (प्रतिनिधी)- अंजूमने तरक्की उर्दू ट्रस्ट संचलित चाँद सुलताना उर्दू हायस्कूलच्या चेअरमनपदी आर्किटेक्ट अर्शद शेख यांची नियुक्ती करण्यात आली. मावळते चेअरमन हाजी नजीर अहमद उर्फ नज्जू पैलवान यांनी पदाची सुत्रे शेख यांच्याकडे सुपुर्द केली. तर नव्याने जाहीर झालेले संचालक मंडळ व नुतन पदाधिकार्‍यांचा सत्कार करण्यात आला.


चाँद सुलताना हायस्कूलमध्ये झालेल्या या कार्यक्रमासाठी नव्याने नियुक्त झालेले उपाध्यक्ष मुजाहिद शेख, सचिव अन्सार सय्यद, सहसचिव हनिफ शेख, अतिक शेख, खजिनदार छाबामिया सय्यद, विश्‍वस्त हाजी मन्सूर शेख, वाजिद शेख, जिया सय्यद, अ‍ॅड. हाफिज शेख, डॉ. सुलतान शेख, डॉ. इकराम खान, अ‍ॅड. नदिम सय्यद, सलिम शेख, इम्तियाज शेख, मौलाना इर्शाद उल्ला, रशिद जहागीरदार, एजाज सय्यद, इमरान जहागीरदार, उपमुख्याध्यापक इम्तियाज तांबोली, पर्यवेक्षक जफर जहागीरदार, इम्तियाज जहागीरदार आदींसह शालेय शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


नुकतीच बैठक होऊन अंजूमने तरक्की उर्दू ट्रस्ट संचलित चाँद सुलताना उर्दू हायस्कूलच्या संचालक मंडळाच्या पदाधिकार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मावळते चेअरमन नज्जू पैलवान म्हणाले की, संस्थेसाठी नेहमीच सहकार्य राहणार आहे. संस्थेच्या विकासासाठी व शिक्षणातून समाजाचा विकास साधण्यासाठी नेहमीच कार्य केले. या शाळेत शिक्षण घेऊन याच शाळेच्या संस्थेत चेअरमन पद भूषविण्याची संधी मिळाली. ब्रिटिश काळातील शैक्षणिक संस्था असून, मागील 28 वर्षापासून संस्थेची सेवा केली असल्याचे स्पष्ट करुन, नवीन चेअरमनकडे जबाबदारी सोपवित असल्याचे सांगितले.


नुतन चेअरमन अर्शद शेख म्हणाले की, मागील इतिहास बाजूला ठेवून, संस्थेच्या उज्वल भविष्यासाठी पुढील वाटचाल राहणार आहे. नवीन पर्वाची सुरुवात झाली असून, ही उर्दू संस्था जिल्ह्यातील सर्वोत्तम संस्था म्हणून पुढे आनण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहे. मस्जिदनंतर शाळा ही पवित्र स्थान असून, मोठ्या विश्‍वासाने पालक आपल्या मुलांना शिक्षणासाठी पाठवत असतात. सक्षमपणे भावी पिढी घडविताना नवीन संचालक व पदाधिकारी संस्थेच्या विकासासाठी योगदान देणार असून, नवीन संचालक मंडळात सुशिक्षित व प्रतिष्ठित समाजातील व्यक्तींचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले. संस्थेत कोणताही वाद न ठेवता नवीन संचालक मंडळ सर्वांना बरोबर घेऊन सेवाभावी योगदान देणार असल्याचे त्यांनी सांगितले. मौलाना इर्शाद उल्ला यांनी शिक्षण घेऊन सफल व्हा, हा संदेश कुरानमध्ये देण्यात आलेला आहे. समाजाने उच्चशिक्षित होऊन, चांगले नागरिक घडून पुढे येण्याचे आवाहन केले. तर सामुदायिक दुवा पठणाने कार्यक्रमाची सांगता झाली.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *