• Wed. Jan 15th, 2025

शहरात रंगली कलर्स ऑफ प्राईड चित्रकला स्पर्धा

ByMirror

Sep 2, 2024

शालेय विद्यार्थ्यांचा उदंड प्रतिसाद

चित्रकलेतून दिला जागतिक शांतता व धार्मिक ऐक्याचा संदेश; तर रेखाटले विकसीत भारताचे चित्र

अहमदनगर (प्रतिनिधी)- लायन्स क्लब ऑफ अहमदनगर प्राईड, लायन्स क्लब ऑफ अहमदनगर व लिओ क्लबच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या कलर्स ऑफ प्राईड या चित्रकला स्पर्धेस शहर व उपनगरातील शालेय विद्यार्थ्यांचा उदंड प्रतिसाद लाभला.

बाळगोपालांनी आपल्या कल्पना शक्तीने जागतिक शांतता व विकसीत भारताचे चित्र रेखाटले. तर भारतातील सण-उत्सव विषयावरील चित्रातून देशात विविधतेने नटलेल्या धार्मिक ऐक्याचे दर्शन घडविले. या स्पर्धेचे हे सहावे वर्ष होते.


भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूल येथील मोनेकला मंदिरात रविवारी (दि.1 सप्टेंबर) ही चित्रकला स्पर्धा पार पडली. सकाळी 9 वाजल्यापासूनच पालकांसह विद्यार्थ्यांनी शालेय मैदान भरले होते. आलेल्या विद्यार्थ्यांची नोंदणी करुन 10 वाजता चित्रकला स्पर्धेला प्रारंभ करण्यात आला. हवेत विविध रंग उडवून या स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.

याप्रसंगी लायन्स प्राईडचे अध्यक्ष अनिकेत आवारे, सचिव अक्षत झालानी, खजिनदार अक्षय तोडमल, लायन्स क्लब ऑफ अहमदनगरच्या अध्यक्षा डॉ. अनघा पारगावकर, सचिव डॉ. सिमरन वाधवा, लिओ क्लबच्या अध्यक्षा रिधिमा गुंदेचा, खजिनदार हर्ष बोरुडे, अभिजित भलगट, सनी वाधवा, रवी तुमनपेल्ली, रोहन खंडेलवाल, कैलास पमनानी, अरविंद पारगावकर, हरजितसिंग वाधवा, सुनील छाजेड, भरत बागरेचा, आंचल कंत्रोड, अर्पिता शिंगवी, गुरनूर वाधवा, हर्ष किथाणी, नरेंद्र बोठे, हर्षवर्धन बोरुडे, राजबीरसिंग संधू, अजित शिंगवी, खुशी तलवार, संभव कासवा, कैलाश नवलानी, प्रशांत गाडेकर, प्रीत कंत्रोड, नंदिनी तलरेजा, सम्यक कोठारी, वेदिका जोशी, जपज्योत बग्गा आदींसह तोडमलस अकॅडमीचे स्वयंसेवक व लायन्सचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.


विद्यार्थ्यांच्या कला-गुणांना वाव देण्यासाठी दरवर्षी कलर्स ऑफ प्राईड या चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. ही स्पर्धा तीन गटात घेण्यात आली. पहिला गट एलकेजी ते पहिली दुसर गट दुसरी ते पाचवी तिसरा गट सहावी ते दहावी, त्यांना अनुक्रमे रेखाटलेल्या चित्रात रंग भरणे, नैसर्गिक देखावा किंवा सण-उत्सव, जागतिक शांतता किंवा सक्षम भारत हे विषय स्पर्धेच्या ठिकाणी देण्यात आले होते. 11:30 वाजता चित्रकला स्पर्धेचा समारोप झाला.

सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. स्पर्धेतील प्रथम विजेत्यास सायकलचे बक्षिस देण्यात येणार असून, इतर विजेत्यांसाठी विविध आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आलेली आहेत. या स्पर्धेसाठी तोडमलस अकॅडमी फॉर कॉमर्स, गवांदे मॅथ्स क्लासेस, सोशल नगर, श्रीमन ग्रुप (पुणे), रेडिओ सिटी, भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूल यांचे सहकार्य लाभले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *