• Thu. Jun 25th, 2026

Mirrornews24

Marathi News

जिल्हास्तरीय विविध गुणदर्शन स्पर्धेत श्रीशा राजश्री शरद आहेर प्रथम

ByMirror

Jan 14, 2025
शाहीर मीराबाई उमप यांची प्रभावीपणे साकारली भूमिका

शाहीर मीराबाई उमप यांची प्रभावीपणे साकारली भूमिका

नगर (प्रतिनिधी)- शहरात पार पडलेल्या जिल्हास्तरीय विविध गुणदर्शन स्पर्धेत श्रीशा राजश्री शरद आहेर या विद्यार्थिनीने प्रथम क्रमांक पटकाविला. तिने किशोर गटातून शाहीर मीराबाई उमप यांची प्रभावीपणे साकारलेली वेशभूषेनुसार भूमिका जिल्हास्तरावर अव्वल ठरली आहे.
रेसिडेन्शिअल हायस्कूल मध्ये नुकतीच ही स्पर्धा पार पडली. श्रीशा राजश्री शरद आहेर ही कोपरगाव तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बहादरपूर (केंद्र -पोहेगाव) ची विद्यार्थिनी आहे. तिने सतत दोन वर्ष तालुकास्तरावर प्राविण्य मिळवले होते. जिल्हास्तरासाठी पात्र ठरली नाही म्हणून अपयशाने खचून न जाता आपल्या मेहनत व जिद्दीच्या जोरावर यावेळी तिने जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक पटकाविला आहे.


तसेच शाळेतील कल्याणी शिवाजी रहाणे, प्रियंका विठ्ठल रहाणे, सोहम पोपट कुडके या विद्यार्थ्यांनीही वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये जिल्हास्तरासाठी कोपरगाव तालुक्याचे प्रतिनिधित्व करुन आपल्या कलेचे उत्कृष्ट सादरीकरण केले. या यशाबद्दल जिल्हा शिक्षणाधिकारी भास्करराव पाटील, गटविकास अधिकारी संदीप दळवी, गटशिक्षणाधिकारी शबाना शेख, विस्तार अधिकारी श्रीमती पुजारी, केंद्रप्रमुख भारती शेळके, मुख्याध्यापक चंद्रकांत डोंगरे, शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामस्थ यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. वर्गशिक्षक रामदास गव्हाणे, मुरलीधर वाकचौरे, गणेश पाचोरे, शरद आहेर, स्वाती मसुते, सारिका गावित, धनश्री भिवसन यांनी श्रीशास मार्गदर्शन केले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *