निरोगी आरोग्यासाठी सार्वजनिक स्वच्छता महत्त्वाची -संजय सपकाळ
अहमदनगर (प्रतिनिधी)- हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने प्रत्येक सदस्यांचा वाढदिवस वृक्षरोपण, रक्तदान, स्वच्छता अभियान आदी सामाजिक उपक्रमाने साजरा करण्यात येतो. या पार्श्वभूमीवर चांदबीबी महाल परिसरात स्वच्छता अभियान राबवून ग्रुपचे ज्येष्ठ सदस्य रमेश वराडे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. चांदबीबी महाल परिसरातील मोठ्या प्रमाणात असलेल्या कचर्याची सफाई करुन परिसर स्वच्छ करण्यात आले.

प्रारंभी योग-प्राणायामाने निरोगी आरोग्याचा जागर करण्यात आला. यावेळी ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संजय सपकाळ, रमेश वराडे, दिपक बडदे, सुभाष गोंधळे, मेजर दिलीप ठोकळ, सर्वेश सपकाळ, मनोहर दरवडे, अभिजित सपकाळ, दिलीप गुगळे, सचिन चोपडा, अशोक पराते, विकास भिंगारदिवे, सरदारसिंग परदेशी, किशोर बोरा, सुमेश केदारे, सलाबत खान, धर्मराज संचेती, अब्बास शेख, अशोकराव लोंढे, मुन्ना वाघस्कर, दिनेश शहापूरकर, रामनाथ गर्जे, विकास निमसे, अजय खडांगळे, महेश सरोदे, अविनाश पोतदार, बापूसाहेब तांबे, संतोष वीर, विनोद खोत, बापुसाहेब निमसे, अमोल सकपाळ, किशोर भगवाने, अशोक भगवाने, जालिंदर अळकुटे, कुमार धतुरे, गणेश सातकर, योगेश चौधरी सदाशिव मांढरे, महेश सरोदे, निर्मला येलुलकर, चंद्रकला येलुलकर, आराध्या परदेशी आदी उपस्थित होते.
संजय सपकाळ म्हणाले की, हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने वर्षभर आरोग्य व पर्यावरण संवर्धनाची चळवळ राबविण्यात येते. प्रत्येक सदस्यांचा वाढदिवस सामाजिक योगदानाने साजरा केला जात असून, अनेक नागरिक या चळवळीशी जुडले गेले आहेत. हरदिनच्या वतीने सार्वजनिक स्वच्छतेसाठी देखील पुढाकार घेण्यात आला असून, नागरिकांना स्वच्छतेचा संदेश देण्यात येत आहे. निरोगी आरोग्यासाठी सार्वजनिक स्वच्छता महत्त्वाची असून, सर्वांनी योगदान दिल्यास स्वच्छ भारतचे स्वप्न साकारले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
