रक्षाबंधन निमित्त बहिणींना ओवाळणी म्हणून रोपांची भेट
हरदिन मॉर्निंग ग्रुपचा उपक्रम
अहमदनगर (प्रतिनिधी)- हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने भिंगार येथील भगवान गौतमबुध्द जॉगिंग पार्क येथे स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवानिमित्त तिरंगा झेंड्याचे वाटप करण्यात आले. तर महिला सदस्यांनी आपल्या भावांना रक्षाबंधन निमित्त राख्या बांधल्या. भावांनी बहिणींना ओवाळणी म्हणून रोपं देऊन मायभूमीला हिरवाईने फुलविण्याचा संदेश दिला.
गुरुवारी (दि.11 ऑगस्ट) सकाळी झालेल्या या कार्यक्रमाने संपुर्ण जॉगिंग पार्क परिसर तिरंगामय झाले होते. योग-प्राणायामानंतर ध्वज वाटपाचा कार्यक्रम पार पडला. तसेच ग्रुपचे सदस्य श्रेयश कटारिया सीए झाल्याबद्दल त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संजय सपकाळ, सीए रविंद्र कटारिया, रमेश वराडे, मेजर दिलीप ठोकळ, किशोर बोरा, सचिन चोपडा, सर्वेश सपकाळ, दिपक बडदे, दिलीप गुगळे, अशोक पराते, रमेश कोठारी, संतोष लुणिया, सुहास देवराईकर, गणेश शहा, दिलीप बोंदर्डे, अभिजीत सपकाळ, राजू शेख, रामनाथ गर्जे, विशाल भामरे, भारती कटारिया, प्रांजली सपकाळ, सुनिता वराडे, सविता परदेशी, चंद्रकला येलुलकर, निर्मलाताई येलुलकर, सुरेखा आमले, शिल्पा वाकळे आदींसह सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सीए रविंद्र कटारिया म्हणाले की, सामाजिक योगदानाने जीवनात समाधान निर्माण होते. आरोग्य व पर्यावरण क्षेत्रात काम करताना हरदिन मॉर्निंग ग्रुपचे सामाजिक क्षेत्रातील योगदान प्रेरणादायी आहे. सेवाभावाने सर्व ग्रुपचे सदस्य समाजात कार्यरत असून, हे या ग्रुपचे वैशिष्टये असल्याचे त्यांनी सांगितले.
संजय सपकाळ म्हणाले की, भारत मातेचे व बहिणींचे खरे रक्षण पर्यावरण संवर्धनाने होणार आहे. पर्यावरणाचा समतोल बिघडल्याने अनेक गंभीर प्रश्न निर्माण होत आहे. निसर्गाचा समतोल साधण्यासाठी वृक्षरोपण व संवर्धनाशिवाय पर्याय नाही. ऑक्सिजन रुपाने जीवन देणार्या झाडांना जगविण्याची गरज आहे. हर घर तिरंगाबरोबर एक व्यक्ती एक झाड ही संकल्पना राबविल्यास पर्यावरणाचे प्रश्न सुटणार असल्याची आशा त्यांनी व्यक्त केली.