पदाधिकार्यांचे उत्कृष्ट कार्याबद्दल गौरव
अहमदनगर (प्रतिनिधी)- लायन्स क्लब ऑफ अहमदनगरच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन वर्षभरात केलेल्या सामाजिक कार्याबद्दल लायन्सच्या प्रांतिक स्तरावर तीन अवॉर्डने सन्मानित करण्यात आले.
नागपूर येथे नुकतेच झालेल्या कॉन्फरन्स मध्ये लायन्सच्या पदाधिकार्यांचा सन्मान झाला. तर पुणे येथील डिस्ट्रिक्ट अवॉर्ड नाईट कार्यक्रमातही क्लबच्या पदाधिकार्यांना उत्कृष्ट कार्याने गौरविण्यात आले.
लायन्स क्लब ऑफ अहमदनगरला बेस्ट लिओ क्लब, लंगर मध्ये केलेले सेवा कार्य व ग्लोबल मेंबरशिप टीम मध्ये केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल हरजीतसिंह वधवा यांना गौरविण्यात आले.

यावेळी आंतरराष्ट्रीय संचालक जितेंद्रसिंग चव्हाण, प्रांतीय अध्यक्ष दिलीप मोदी, माजी प्रांत अध्यक्ष तथा राज घराण्यातील वंशज माधवरावजी भोसले, माजी आंतरराष्ट्रीय संचालक नवल मालू आदी उपस्थित होते.

तर पुणे येथे झालेल्या डिस्ट्रिक्ट अवॉर्ड नाईट कार्यक्रमात लायन्स क्लब ऑफ अहमदनगरच्या डॉ. सिमरन वधवा यांना बेस्ट प्रेसिडेंट, प्रणिता भंडारी यांना बेस्ट सेक्रेटरी तर प्रिया मुनोत यांना बेस्ट खजिनदार अवॉर्डने गौरविण्यात आले. क्लबचे कॅबिनेट अधिकारी हरजीतसिंह वधवा, झोन चेअरमन आनंद बोरा, धनंजय भंडारे, दिलीप कुलकर्णी, विजय कुलकर्णी यांना त्यांच्या क्षेत्रात केलेल्या विशेष सामाजिक कार्यासाठी सन्मानित करण्यात आले.