परिक्षा केंद्रावर गुलाबपुष्पाचे वाटप
अहमदनगर (प्रतिनिधी)- मंगळवार (दि.15 मार्च) पासून सुरु झालेल्या दहावी बोर्डाच्या बोर्डाच्या परीक्षेनिमित्त दिवसभर अर्थार्जन करुन रात्री विद्यार्जन करणारे रात्रप्रशालेतील परीक्षार्थींना भिंगार राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने ऑल दी बेस्ट म्हणत परीक्षेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. भिंगार हायस्कूल येथे सर्व परीक्षार्थींना गुलाबपुष्पाचे वाटप करण्यात आले. यावेळी भिंगार राष्ट्रवादी शहराध्यक्ष संजय सपकाळ, मुख्याध्यापक राजेंद्र बेद्रे, उपमुख्याध्यापक रविंद्र लोंढे, पर्यवेक्षक गितांजली भावे, बी.ए. भालसिंग, कैलास करसे, रात्रप्रशाळा मुख्याध्यापक वाळुंजकर, युवक उपाध्यक्ष अभिजीत सपकाळ, कॅन्टोमेंट बोर्डाचे उपाध्यक्ष संभाजी भिंगारदिवे, काशीनाथ साळुंके, भारत पवार, सर्वेश सपकाळ, सदाशिव मांढरे, गणेश शिंदे, भरत थोरात, दिपक बडदे, रमेश वराडे, दिलीप ठोकळ मेजर, राजकुमार कार्ले, दादासाहेब पाठक आदी उपस्थित होते.
संजय सपकाळ म्हणाले की, कोरोनामुळे अनेकांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली असून, अनेक विद्यार्थी दिवसभर कामे करुन संध्याकाळी रात्रप्रशालेत शिक्षण घेत आहे. कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी हातभार लाऊन शिक्षण घेण्याची उमेद व आयुष्यात काही तरी करुन दाखवण्याची जिद्द असलेल्या परीक्षार्थींना राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. या परीक्षेच्या गुणांवर विद्यार्थ्यांचे पुढील भवितव्य अवलंबून असून, त्यांचे मनोधैर्य उंचावण्यासाठी व तणावमुक्त पध्तीने पेपर जाण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.