बाबासाहेबांच्या विचाराने पक्षाची वाटचाल -अमित काळे
अहमदनगर (प्रतिनिधी)- भिंगार येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) च्या वतीने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 132 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
यावेळी भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनकर मुंडे, भाजपचे शहराध्यक्ष तथा कॅन्टोन्मेंट बोर्डाचे माजी उपाध्यक्ष वसंत राठोड, सुनिल काळे, रिपाईचे युवक जिल्हाध्यक्ष अमित काळे, शहापूर केकतीचे सरपंच देवराज भालसिंग, आयटी सेलचे जिल्हा संपर्कप्रमुख मंगेश मोकळ, भारतीय वाल्मीक संघटनेचे अध्यक्ष तालेवर गोहेर, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजय सपकाळ, रोहित कांबळे, विक्रम चव्हाण, अशोक भोसले, महेश भिंगारदिवे, गौतम कांबळे, धनराज जाधव, संतोष कांबळे, दिनेश कांबळे, प्रशांत पाटोळे, संतोष हजारे, अभिजित सपकाळ, जहीर सय्यद, पोलिस नाईक राहुल द्वारके आदी उपस्थित होते.
अमित काळे म्हणाले की, दीन, दलित व दुर्बल घटकातील लोकांसाठी डॉ. बाबासाहेबांनी कार्य केले. त्यांच्या अथक प्रयत्नाने स्वातंत्र्यता, समता व बंधुत्वाची मुल्य रुजविणारी घटना असतित्वात आली. मनुष्याला मनुष्य म्हणून जगण्याचा अधिकार बाबासाहेबांमुळे मिळाला. त्यांचे विचार घेऊन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाची वाटचाल सुरु असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.