• Fri. Sep 19th, 2025

भाऊसाहेब फिरोदिया, अशोकभाऊ फिरोदिया व रूपीबाई बोरा स्कूलच्या बारावी बोर्डातील गुणवंतांचा गौरव

ByMirror

Jun 5, 2023

शिक्षण हेच प्रगतीचे माध्यम आहे -अशोक मुथा

वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता बारावी एचएससी बोर्डाच्या परीक्षेत अहमदनगर एज्युकेशन सोसायटीचे भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूल, अशोकभाऊ फिरोदिया इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनियर कॉलेज आणि रूपीबाई मोतीलालजी बोरा न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. तिन्ही शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा संस्थेच्या वतीने गौरव करण्यात आला.


संस्थेचे उपाध्यक्ष अशोक मुथा व खजिनदार प्रकाश गांधी यांच्या हस्ते शाळेच्या गुणवत्ता यादीत चमकलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी भाऊसाहेब फिरोदियाचे मुख्याध्यापक उल्हास दुगड, अशोकभाऊ फिरोदियाचे मुख्याध्यापक प्रभाकर भाबड, रूपीबाई बोराचे मुख्याध्यापक अजय बारगळ यांच्यासह शालेय शिक्षक, विद्यार्थी, पालक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.


अशोक मुथा म्हणाले की, शिक्षण हेच प्रगतीचे माध्यम आहे. शिक्षणाला गुणवत्तेची जोड मिळाल्यास तो विद्यार्थी जीवनात यशस्वी होणार आहे. जास्तीत जास्त शिक्षण घेऊन मोठे व्हा व आपल्या कुटुंबासह शहराचे नाव उज्वल करण्याचे त्यांनी सांगितले.


प्रकाश गांधी म्हणाले की, स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी नव-नवीन क्षेत्राकडे वळण्याची गरज आहे. स्पर्धामय युगात विविध क्षेत्राच्या वाटा विस्तारल्या गेल्या आहेत. पारंपारिक दिशेने न जाता आपल्या आवडीच्या क्षेत्राकडे वळण्याचे त्यांनी आवाहन केले. प्रारंभी सरस्वती पूजन करुन कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रास्ताविकात विनोद नगरकर यांनी वाढता गुणवत्तेचा आलेख सादर केला. गुणवंत विद्यार्थ्यांना संस्थेच्या प्रमुख कार्यवाह छायाताई फिरोदिया व सहकार्यवाह गौरव फिरोदिया यांनी शुभेच्छा दिल्या.


या गौरव सोहळ्यात इयत्ता बारावी मधील शालेय गुणवत्ता यादीत चमकलेल्या पुढील विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूल शास्त्र विभाग प्रथम-श्रेयस दौंड (88.17 टक्के), द्वितीय- रोहन साळी (87.83 टक्के), तृतीय- लब्धी चंगेडिया (82.67 टक्के), चौथी- प्रेरणा कोहक, सानिका नगरकर (78.33 टक्के), पाचवा- हर्षल कटारिया (78 टक्के), वाणिज्य विभाग- प्रथम- विराज गुंदेचा (95.17 टक्के), द्वितीय- अनुष्का खंडेलवाल (94.83 टक्के), तृतीय- सुजल गादिया (92.83 टक्के), चौथी- जिनेशा गांधी (92.33 टक्के), पाचवी- जानवी काथेड (91.67 टक्के), तसेच श्रीकृष्ण पिंपळे व विराज गुंदेचा यांना अकाऊंट विषयात शंभर पैकी शंभर गुण.


अशोकभाऊ फिरोदिया इंग्लिश मीडियम स्कूल शास्त्र विभाग प्रथम- स्वामिनी सावंत (80.66 टक्के), द्वितीय-अनिश कटारिया (74.83 टक्के), तृतीय- मयंक भंडारी (73.67), चौथी- ज्ञानेश्‍वरी डांगे (73.33 टक्के), पाचवी- स्मृती गारुडकर (67 टक्के).


रूपीबाई मोतीलालजी बोरा न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज कला विभाग प्रथम- वृषाली कांगुडे (82.33 टक्के), द्वितीय- अस्मिता औटी (74.33 टक्के), तृतीय- साक्षी कराळे (73.83 टक्के), चौथी- श्रृती चावरे (72.67 टक्के), पाचवी- प्रतिभा दरेकर (70.83 टक्के), शास्त्र विभाग प्रथम- हर्षवर्धन कोतकर (68.50 टक्के), द्वितीय- ओमराजे भोसले (64.83 टक्के), तृतीय- सुरज मुनोत (61.83 टक्के), चौथा-कृष्णा हजारे (60 टक्के), पाचवा- सुरज चितळकर (59.17 टक्के). कला शाखेतील वृषाली कांगुडे ही विद्यार्थिनी सर्व विषयात प्रथम आली.

विद्यार्थ्यांच्या सत्काराच्या नावांची घोषणा शिल्पा गांधी यांनी केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन अनिरुध्द कुलकर्णी यांनी केले. आभार सोमनाथ नजान यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *