• Mon. Jun 15th, 2026

Mirrornews24

Marathi News

पाटबंधारे व सार्वजनिक बांधकाम खाते कर्मचारी पतसंस्थेच्या संगणक प्रणाली व मोबाईल अ‍ॅपचा लोकार्पण

ByMirror

Sep 8, 2022

डिजीटल युगात पतसंस्था व बँक प्रणाली अद्यावत होणे काळाची गरज -राधाकृष्ण विखे पाटील

अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील पाटबंधारे व सार्वजनिक बांधकाम खाते कर्मचारी पतसंस्थेच्या संगणक प्रणाली व मोबाईल अ‍ॅपचा लोकार्पण सोहळा महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते झाला. दिल्लीगेट येथील संस्थेच्या मुख्य कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाप्रसंगी जिल्हा उपनिबंधक गणेश पुरी, संस्थेचे पदसिध्द अध्यक्ष तथा कार्यकारी अभियंता जी.बी. नान्नोर या प्रमुख पाहुण्यांसह चेअरमन उमेश डावखर, व्हाईस चेअरमन अजय लखापती, सर्व संचालक, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्‍वर हळगावकर आदी उपस्थित होते.


राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, डिजीटल युगात पतसंस्था व बँक प्रणाली अद्यावत होणे काळाची गरज निर्माण झाली आहे. या पतसंस्थेने आधुनिक संगणक प्रणाली व सभासदांच्या सोयीसाठी मोबाईल अ‍ॅप उपलब्ध करुन तंत्रज्ञानाच्या युगात टाकलेले पाऊल असून, यामुळे घरबसल्या खातेदारांना स्वतःच्या खात्याची माहिती उपलब्ध होऊ शकणार आहे. तर संस्थेचा स्वच्छ व निर्मळ कारभार उंचावणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच त्यांनी संस्थेच्या प्रगतीसाठी चेअरमन उमेश डावखर, व्हाईस चेअरमन अजय लखापती, विद्यमान संचालक मंडळाने केलेल्या कार्याचे कौतुक केले.


प्रास्ताविकात जी.बी. नान्नोर यांनी संस्थेच्या आर्थिक स्थितीविषयी माहिती दिली. जिल्हा उपनिबंधक गणेश पुरी यांनी संस्थेची आर्थिक प्रगती व कामकाजा विषयी समाधान व्यक्त करून संस्थेच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी संचालक मंडळ सदस्य नवनाथ घोंगडे, शिवाजी तोरणे, दीपक वाळके, शांताराम आवारी, ललित पवार, दत्तात्रय गडाख, प्रियंका मिसाळ आदींसह संस्थेचे कर्मचारी वर्ग आणि संस्थेचे जिल्हा कार्यक्षेत्रातील सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. संचालक नारायण तमनर यांनी आभार मानले.


By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *