परिसरातील नागरिकांना फेज टूची लाईन जोडून देण्याचे आश्वासन
प्रभागातील नागरी प्रश्न सोडविण्याचे काम झपाट्याने सुरु -नगरसेवक अनिल शिंदे
अहमदनगर (प्रतिनिधी)- प्रभागातील नागरी प्रश्न सोडविण्याचे काम झपाट्याने सुरु आहेत. विकास कामे हेच ध्येयसमोर ठेवून कामे पुर्णत्वाला जात आहे. विकासकामात राजकारण न करता सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडविण्याचा ध्यास घेऊन कामे हाती घेण्यात आली आहे. प्रभाग 15 मधील रस्त्यांसह विविध विकास कामांसाठी 35 कोटी रुपयांची मागणी करण्यात आली असल्याचे प्रतिपादन नगरसेवक अनिल शिंदे यांनी केले.

नगर-कल्याण रोड परिसरातील हॅपी थॉट, पावन म्हसोबा नगर येथे नगरसेवक यांच्या प्रयत्नाने मंजूर झालेल्या अंतर्गत ड्रेनेज लाईन कामाचा शुभारंभ माजी प्राचार्य खासेराव शितोळे यांच्या हस्ते झाले. यावेळी नगरसेवक शिंदे बोलत होते. याप्रसंगी जिल्हा केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष दत्ताभाऊ गाडळकर, पारुनाथ ढोकळे, संतोषराव दसासे, विजुभाऊ गाडळकर, भगवान काटे, अभयजी शेंडगे, अॅड. चेतन रोहकले, पंडितराव हराळ, आशिष शिंदे, अमोल भागवत, ओंकार शिंदे, बाळासाहेब ठुबे, गणेश कचरे, हिरामण गुंड, शिवाजी डेरे, दत्तात्रय कर्डिले, अंकुश कदम, गणेश गाडगे, लाटे मेजर, सुनील गुंजाळ, बाळासाहेब साळवे, अफसर पठाण, गुलाब कुलट, अॅड. पल्लवी खाडे, मनिषा सोनवणे, सुजाता कर्डिले, शितल आगरकर, सुवर्णा करांडे, प्रियंका भागवत, कोमल घुमरे, शोभा घोरपडे, वैष्णवी चिंधाडे, अर्चना कुलट, प्रकाश साळवे, राजेश पठारे, रामदास दाते, केदार खाडे, अशोक कर्डिले, अमर गोंधळे, ललित सांगळे, ऋषिकेश लखापती, महेश नाळके आदींसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढे नगरसेवक शिंदे म्हणाले की, नागरिकांनी मागणी केल्यानंतर तात्काळ सव्वा महिन्यामध्ये ड्रेनेजलाईनचे तीन कामे मार्गी लावण्यात आले. नागरिकांचे प्रश्न सोडविण्याचे काम सुरू असून, नागरिकांनी देखील कामाचा दर्जा तपासून चांगल्या पध्दतीने कामे करुन घेण्याचे आवाहन केले. तर नागरिकांनी केलेल्या फेज टू च्या मागणीला प्रतिसाद देऊन शिंदे यांनी तात्काळ फेज टूची लाईन जोडून देण्याचे आश्वासन दिले.

प्रास्ताविकात हिरामण गुंड म्हणाले की, शब्द पाळणारा नगरसेवक म्हणून शिंदे यांनी आपली ओळख निर्माण केली आहे. काही महिन्यांपूर्वी त्यांनी परिसरातील ड्रेनेजलाईनचे काम सुरु करण्याचा शब्द दिला होता. हा प्रश्न त्यांनी प्राधान्याने सोडविल्याचे स्पष्ट केले.
माजी प्राचार्य खासेराव शितोळे म्हणाले की, प्रभागात रस्ता, पाणी, ड्रेनेजलाईन हे मूलभूत प्रश्न सुटणे आवश्यक आहे. नगरसेवक अनिल शिंदे यांच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीने काम सुरू आहे. या प्रभागातील सगळे रस्त्यांचे मोजमाप करून त्यांनी विकासात्मक तयार केलेला आराखडा कौतुकास्पद आहे. विकासात्मक व्हिजन घेऊन त्यांचे कार्य सुरु असून, त्यांनी राज्य सरकारकडे देखील भरीव निधीची मागणी केली असल्याचे त्यांनी सांगितले. तर नागरिकांनी देखील त्यांना सहकार्य करण्याचे आवाहन केले. भगवान काटे म्हणाले की, कॉलनीमध्ये सर्वांची एकजुट राहिल्यास चांगल्या पध्दतीने विकास कामे मार्गी लावता येते. ज्येष्ठ नगरसेवक असलेले अनिल शिंदे यांना कामाचा असलेला दांडगा अनुभव उत्तम पध्दतीने कामे करुन घेण्याची हातोटीने ते झपाट्याने विकास कामे मार्गी लावत आहे. अन्यथा नागरिकांना काही काम करुन घेण्यासाठी वारंवार चकरा मारुन पाठपुरावा करावा लागतो. प्रभागाला एक चांगले काम करणारे नेतृत्व मिळाले असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पारुनाथ ढोकळे यांनी केले. आभार गुलाब कुलट यांनी मानले. या कार्यक्रमासाठी स्वप्निल घोरपडे, विशाल गायकवाड, अनिल चव्हाण, अनिल सैद, पोपट कोतकर, नवनाथ घुमरे, सचिन करांडे, मोहन निकम, गणेश पोरे, आदित्य आगरकर, संपत हिंगे, संजय बोठे, संदीप कर्डिले, संदीप सोनवणे, अरविंद सूर्यवंशी, जिवाजी लगड, प्रकाश मिश्रा, अमित येवले, ऋषिकेश शिंगाडे, वैशाली नाळके, जयश्री गायकवाड, सविता पवार, सुजाता बोठे, सुनिता मिश्रा, मुक्ता हिंगे, प्रियंका गायकवाड आदी उपस्थित होते.