• Mon. Jun 29th, 2026

Mirrornews24

Marathi News

चर्मकार समाजातील गुणवंत व यशवंतांचा होणार सन्मान

ByMirror

Aug 5, 2023

चर्मकार विकास संघ व मा.आ. सितारामजी घनदाट सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने गुणगौरव सोहळ्याचे आयोजन

अहमदनगर (प्रतिनिधी)- चर्मकार विकास संघ व लोकनेते माजी आमदार सितारामजी घनदाट (मामा) सामाजिक प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने चर्मकार समाजातील गुणवंत विद्यार्थी, विविध क्षेत्रात यश प्राप्त करणाऱ्या युवक-युवती व समाजबांधवांचा गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.


चर्मकार विकास संघाचे प्रदेशाध्यक्ष संजय खामकर यांच्या मार्गदर्शनाखाली 20 ऑगस्ट रोजी शहरातील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालय, टिळक रोड येथे गुणगौरव सोहळा प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये होणार आहे. यामध्ये चर्मकार समाजाचे जिल्ह्यातील इयत्ता दहावी, बारावी, पदवीधर, पीएचडी विविध क्षेत्रातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान केला जाणार आहे. तर विविध क्षेत्रात यश प्राप्त करणाऱ्या युवक-युवतींचा व समाजबांधवांचा गौरव होणार आहे.


या गुणगौरव सोहळ्यासाठी गुणवंत विद्यार्थी, यश प्राप्त करणाऱ्या युवक युवती व समाजबांधवांची माहिती चर्मकार विकास संघ व लोकनेते माजी आमदार सितारामजी घनदाट (मामा) सामाजिक प्रतिष्ठानच्या प्रतिनिधींकडे देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी संतोष कानडे- 9763922027, दिलीप कांबळे- 7373454690, विनोद कांबळे- 9096199571 यांना संपर्क साधण्याचे सांगण्यात आले आहे.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *