• Mon. Jun 29th, 2026

Mirrornews24

Marathi News

गुरुवारी चंद्रदर्शन झाल्याने पवित्र रमजान महिन्याला प्रारंभ

ByMirror

Mar 23, 2023

शुक्रवारी रमजानचा पहिला रोजा

अहमदनगर (प्रतिनिधी)- गुरुवारी संध्याकाळी शहरात (दि.23 मार्च) चंद्रदर्शन झाल्याने मुस्लिम समाज बांधवांच्या पवित्र रमजान महिन्याची सुरुवात झाली असून, शुक्रवारी पहिला रोजा (उपवास) असणार आहे. चंद्रदर्शन होताच मुस्लिम बांधवांनी एकमेकांना रमजान प्रारंभच्या शुभेच्छा दिल्या.


शांतता, प्रेम, बंधुभाव, त्याग व उपासनेचा प्रतिक असलेल्या रमजान महिन्यात मुस्लिम बांधव रोजे करुन अल्लाहच्या इबादत (प्रार्थनेत) मध्ये असतात. या महिन्यात सर्व मुस्लिम बांधव पहाटे सुर्योदयपूर्वी सहेरी करुन उपवास धरतात. तर संध्याकाळी सुर्यास्तावेळी इफ्तार करुन उपवास सोडला जातो. यामध्ये संपुर्ण दिवसभर पाणी, अन्न काही घेतले जात नाही.

घरोघरी व मशिद मध्ये कुरान पठण करुन मिस्लिम बांधव पाच वेळची नमाज अदा करत असतात. रात्री तराहवीची विशेष नमाज अदा केली जाते. ज्या मध्ये कुरानच्या पारेचा समावेश असतो. नमाजनंतर मशिदमध्ये जे पठण झाले त्याचा अर्थ देखील मौलाना विशद करत असतात. या महिन्यात मोठ्या प्रमाणात दान-धर्म केले जाते.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *