• Fri. Sep 19th, 2025

खासदार संजय राऊत यांच्या प्रतिमेला शहरात जोडे मारो आंदोलन

ByMirror

Jun 3, 2023

शिवसैनिकांनी राऊतांची प्रतिमा पायाखाली तुडवून केला त्या कृत्याचा निषेध

वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर पत्रकार परिषदेत विचारले गेलेल्या प्रश्‍नावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी बाजूला थुंकल्याच्या निषेधार्थ शहरात दिल्लीगेट वेस समोर शिवसेनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले. खासदार संजय राऊत यांच्या प्रतिमेला जोडे मारुन, त्यांची प्रतिमा पायाखाली तुडविण्यात आली.


या आंदोलनात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिल शिंदे, बाबुशेठ टायरवाले, संपर्क प्रमुख सचिन जाधव, शहर प्रमुख दिलीप सातपुते, युवा सेनेचे जिल्हाप्रमुख योगेश गलांडे, शहर प्रमुख महेश लोंढे, आकाश कातोरे, ओंकार शिंदे, अभिषेक भोसले, नगरसेवक मदन आढाव, चंद्रकांत उजागरे, रणजित परदेशी, काका शेळके, भरत कांडेकर, अनिल लोखंडे, प्रल्हाद जोशी, राजू कोंडके, शुभम पारगे, सागर काळे आदींसह शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.


अनिल शिंदे म्हणाले की, राजकारणातील मूर्खपणाचा कळस म्हणजे संजय राऊत यांची प्रतिमा आहे. नेहमीच वादग्रस्त विधान व कृत्य करुन प्रसिध्दी झोतात येण्याचे काम ते करत आहे. या प्रकाराला यापुढे दुर्लक्ष केले जाणार नसून, जशास तसे उत्तर दिले जाणार आहे. अहमदनगर जिल्ह्यात राऊत यांना फिरु देणार नसल्याचे त्यांनी सांगितले.


दिलीप सातपुते म्हणाले की, राजकारणातील गलिच्छवृत्तीचा प्रकाराचे दर्शन संजय राऊत यांच्याकडून घडत आहे. उद्धव ठाकरे यांची शिवसेना संपवण्याचे काम त्यांनी केले. सकाळी उठल्याबरोबर वेगळे पदार्थ खात असल्याने ते बरळत असल्याचे त्यांनी सांगितले. बाबुशेठ टायरवाले म्हणाले की, राजकारणात व महाराष्ट्रात संजय राऊत यांना किंमत नाही. कोणी विचारत नसल्याने वादग्रस्त करून वक्तव्य करुन सर्वांचे लक्ष वेधण्याचे काम ते करत असल्याचे त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *