• Mon. Jun 29th, 2026

Mirrornews24

Marathi News

केडगावला हनुमान जन्मोत्सव व मंदिराचा जीर्णोध्दार सोहळा उत्साहात साजरा

ByMirror

Apr 9, 2023

भाविकांना महाप्रसादाचे वाटप

अहमदनगर (प्रतिनिधी)- केडगाव येथील ओंकार नगर मित्र मंडळ व शिवरत्न प्रतिष्ठानच्या वतीने हनुमान जन्मोत्सव व मंदिराचा जीर्णोध्दार सोहळा उत्साहात पार पडला. हनुमान मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. तर यावेळी भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. मागील 35 वर्षापासून हा हनुमान जन्मोत्सव मंदिरात सोहळा साजरा करण्यात येत आहे.


जन्मोत्सव व मंदिराचा जीर्णोध्दार निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. उपस्थित भाविकांनी हनुमान चालीसाचे पठण केले. आरतीसाठी जिल्हा परिषद सदस्य सचिन जगताप, उद्योजक सचिन कोतकर, प्रतिष्ठानचे अध्यक्ष बलभीम कर्डिले आदींसह मंडळाचे सदस्य व कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने महाप्रसादाचा लाभ घेतला. अध्यक्ष कर्डिले यांनी मंदिरासाठी व महाप्रसादासाठी देणगी देणार्‍या भाविकांचे आभार मानले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *