रस्त्यांचे प्रश्न मार्गी लावून खड्डेमय शहराची ओळख पुसण्याचे काम सुरु -रोहिणीताई शेंडगे
अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील रस्ते चांगले करण्याचा प्रयत्न सुरू असून, त्या दृष्टीने विविध ठिकाणी रस्ता डांबरीकरण व काँक्रिटीकरणाचे काम सुरु आहे. खड्डेमय शहराची ओळख पुसण्याचे काम शिवसेनेच्या माध्यमातून करण्यात आले आहे. शहराच्या उपनगरात देखील विशेष लक्ष देऊन रस्त्यांचे प्रश्न मार्गी लावण्यात येत आहे. तर पाण्याचा प्रश्न देखील फेज टू च्या योजनेद्वारे सुटणार असल्याची अपेक्षा महापौर रोहिणीताई शेंडगे यांनी व्यक्त केली.
काटवन खंडोबा रोड, गाझी नगर येथील रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरणाचे काम महापौर निधीतून नगरसेविका सुवर्णा जाधव यांच्या पाठपुराव्याने करण्यात आले. काम पूर्ण झालेल्या रस्त्याचा लोकार्पण सोहळा महापौर शेंडगे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी त्या बोलत होत्या. याप्रसंगी स्थायी समितीचे सभापती गणेश कवडे, शिवसेनेचे शहर प्रमुख संभाजी कदम, माजी विरोधी पक्ष नेते संजय शेंडगे, माजी उपमहापौर अनिल बोरुडे, नगरसेविका सुवर्णाताई जाधव, नगरसेवक प्रशांत गायकवाड, दिपक खैरे, उद्योजक दत्ता जाधव, निलेश गाडळकर, राजूशेठ एकाडे, रुकसार गौस, आरिफ मोबीनोद्दीन, आमेना शेख, फरहाना शेख, नाहिद सय्यद, लक्ष्मी खैरनार, हिना बागवान, सना शेख, आसमा बागवान, शब्बीर बागवान, हसिना बागवान, इमरान पठाण, आदिनाश शिंदे, विकी कानडे, अमित गाडळकर, श्रेयश धाडगे, विशाल गाडळकर, अमोल शिंदे आदी उपस्थित होते.
गणेश कवडे म्हणाले की, शिवसेनेचा महापौर झाल्यापासून शहरात विकास कामाला चालना मिळाली आहे. अनेक प्रलंबीत विकास कामे मार्गी लागली असून, शहर खड्डे मुक्त करण्याचा संकल्प घेऊन कार्य केले जात असल्याचे त्यांनी सांगितले. नगरसेविका सुवर्णाताई जाधव यांनी प्रभागातील नागरिकांच्या समस्या सोडविण्याचे काम सुरू आहे. दुर्लक्षित राहिलेल्या प्रभागातील सर्व प्रश्न मार्गी लावण्याचे काम झपाट्याने केले जाणार असल्याचे सांगितले.
संभाजी कदम म्हणाले की, अत्यंत महत्त्वाचा व दुर्लक्षित राहिलेल्या रस्त्याचे काम मार्गी लावण्यात आले. पावसाळ्यात नागरिकांना चिखलमय रस्त्यातून वाट काढत जावे लागत होते. महिलांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. तर येथे असलेल्या मुस्लिम समाजाच्या कब्रस्तानमध्ये अंत्यविधीसाठी आलेल्या लोकांची मोठी गैरसोय होत होती. नगरसेविका सुवर्णाताई जाधव यांच्या पाठपुराव्याने हा प्रश्न मार्गी लावण्यात आला आहे. लोकांना नागरी सुविधा देण्याचे काम शिवसेनेच्या माध्यमातून सातत्याने केले जात आहे. शहराला विकासात्मक रुप देण्याचे काम सुरु असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दत्ता जाधव म्हणाले की, शिवसेनेचा महापौर झाल्यानंतर विविध विकास कामे मार्गी लागत आहे. निधी उपलब्ध झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने विविध विकास कामे मार्गी लावण्याचे काम सुरु आहे. आगरकर मळा, कल्याण रोड आदी परिसरातील विकास कामे हाती घेण्यात आले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी नागरिकांनी जिव्हाळ्याचा असलेला रस्त्याचा प्रश्न सोडविल्याबद्दल महापौर व नगरसेविका यांचे आभार मानले.