• Mon. Jun 29th, 2026

Mirrornews24

Marathi News

इंटर स्कूल फुटबॉल स्पर्धेत आठरे पाटील स्कूलने विजयी घौडदौड

ByMirror

Jul 18, 2023

ओएसिस स्कूल, आर्मी पब्लिक स्कूल, आयकॉन पब्लिक स्कूल संघ विजयी

अहमदनगर (प्रतिनिधी)- फिरोदिया शिवाजीयन्सच्या वतीने अहमदनगर महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या इंटर स्कूल फुटबॉल स्पर्धेत मंगळवारी (18 जुलै) झालेल्या सामन्यांमध्ये आठरे पाटील स्कूलने विजयी घौडदौड सुरु ठेवली. 16, 14 व 12 वर्ष वयोगटात आठरे पाटील स्कूलच्या संघाने विजय मिळवून आपल्या उत्कृष्ट खेळाची छाप सोडली. तर ओएसिस स्कूल, आर्मी पब्लिक स्कूल, आयकॉन पब्लिक स्कूल संघाने विजय मिळवला.


16 वर्ष व 14 वर्ष वयोगटात आठरे पाटील स्कूल विरुध्द अशोकभाऊ फिरोदिया यांच्यात सामना झाला. 16 वर्ष वयोगटात 6-0 गोलने तर 14 वर्ष वयोगटात 14-0 गोलने आठरे पाटील स्कूलने एकहाती विजय मिळवला.
12 वर्ष वयोगटात आठरे पाटील स्कूल विरुध्द ओएसिस स्कूल मध्ये झालेल्या सामन्यात आठरे पाटील स्कूलने 3-0 गोलने विजय संपादन केले.

तर ज्ञानसंपदा विरुध्द ओएसिस स्कूल मधील सामन्यात ओएसिस स्कूलने 3-0 गोलने विजय मिळवला. तर श्री साई इग्लिश मिडीयम स्कूल विरुध्द आर्मी पब्लिक स्कूल या सामन्यात आर्मी पब्लिक स्कूलने 6-0 गोलने विजय पटकाविला. आयकॉन पब्लिक स्कूल विरुध्द तक्षीला यांच्यातील सामना शेवट पर्यंत अटीतटीचा होऊन अनिर्णित राहिला.


14 व 16 वर्ष वयोगटात आयकॉन पब्लिक स्कूल विरुध्द पोदार स्कूल मध्ये झालेल्या सामन्यात आयकॉन पब्लिक स्कूलने दोन्ही सामन्यात 3-0 गोलने पोदार स्कूलवर विजय मिळवला. स्पर्धेचे पंच म्हणून अभिषेक सोनवणे, सुयोग महागडे, अभय साळवे, प्रभू कुमार, राजेश चव्हाण, सुशील लोट काम पाहत आहे. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी शिवाजीयन्स अकॅडमीचे अध्यक्ष मनोज वाळवेकर, उपाध्यक्ष खालिद सय्यद, पल्लवी सैंदाणे, व्हिक्टर जोसेफ, जेव्हीअर स्वामी आदी परिश्रम घेत आहे.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *