• Sun. Jun 21st, 2026

Mirrornews24

Marathi News

अजमेरच्या उरुससाठी शहरातून हजारो भाविकांचे जथेच्या जथे रवाना

ByMirror

Jan 27, 2023

सुफी संत ख्वाजा गरीब नवाज यांचा 811 उरुस

अहमदनगर (प्रतिनिधी)- सुफी संत ख्वाजा मोइनुद्दीन हसन चिश्ती (गरीब नवाज) यांच्या 811 व्या उरुसनिमित्त शहरातून हजारो भाविकांचे जथेच्या जथे रवाना झाले आहेत. अजमेर (राजस्थान) येथे मोठ्या उत्साहात उरुस साजरा होत असून लाखोंच्या संख्येने भाविक या धार्मिक सोहळ्यासाठी हजर झाले आहेत.


अहमदनगर शहरातून मोठ्या संख्येने भाविक या उरुसमध्ये सहभागी होण्यासाठी निघाले आहेत. भाविकांना थेट अजमेरला जाण्यासाठी रेल्वे अथवा बसची सुविधा नसल्याने शहरातून विशेष खासगी लक्झरी बस व वाहने करुन भाविकांची चौका-चौकातून अजमेरसाठी रवानगी झाली.


शहरातून फजल शेख, मोहसीन मिर्जा व नदिम शेख यांनी सात दिवसीय यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये नागरिकांना जाणे, येणे, निवास, भोजनची व्यवस्था अल्पखर्चात सेवाभावाने करण्यात आलेली आहे. या यात्रेत मोठ्या संख्येने भाविक सहभागी झाले आहेत. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वरात्री भाविक हातात तिरंगे ध्वज घेऊन या गरीब नवाज…, हिंदल वली सरकारच्या घोषणा देत ऊरुससाठी रवाना झाले.


ख्वाजा गरीब नवाज यांचा 811 वा उरुस म्हणजेच छट्टी शरीफ रविवारी (दि.29 जानेवारी) रोजी साजरी होत आहे.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *