सैनिक समाज पार्टीकडून लढविणार निवडणुक
नगर (प्रतिनिधी)- विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सैनिक समाज पार्टीकडून श्रीगोंदा मतदार संघातून विनोद साहेबराव साळवे यांनी मंगळवारी (दि.29 ऑक्टोबर) उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी सैनिक समाज पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष कर्नल परमार, प्रदेशा ध्यक्ष ॲड. शिवाजी डमाळे, त्रिदल माजी सैनिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदीप लगड, सह्याद्री छावा संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष रावसाहेब काळे पाटील, धडक जनरल कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्रीधर शेलार आदींसह माजी सैनिक उपस्थित होते.
सैनिक समाज पार्टीने स्वच्छ चारित्र्य असलेल्या उच्च शिक्षित युवा उमेदवाराला संधी दिली आहे. प्रस्थापित घराणेशाहीला पर्याय देण्यासाठीचा हा प्रयत्न आहे. देश सेवेचे कर्तव्य बजावून माजी सैनिक राजकारणात येऊन देशाच्या विकासात योगदान देणार असल्याचे रावसाहेब काळे यांनी स्पष्ट केले. सैनिक समाज पार्टीने दिलेला उमेदवार निवडून देऊन देश सेवा करण्याची संधी देण्याचे आवाहन ॲड. शिवाजी डमाळे यांनी केले. सत्ताधाऱ्यांनी फक्त घरे भरण्यासाठी सत्ता राबविल्याचा आरोप त्यांनी केला.