रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना उपस्थित राहण्याचे आवाहन
अहमदनगर (प्रतिनिधी)- लोकसभा व इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी संदर्भात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा अहमदनगर जिल्हा निरीक्षण आढावा दौरा होणार आहे. या पार्श्वभूमीवर शनिवारी राहुरी फॅक्टरी येथे उत्तर जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात व राहुरी तालुकाध्यक्ष विलास नाना साळवे यांनी जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली असल्याची माहिती रिपाई युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष अमित काळे यांनी दिली.
3 फेब्रुवारी रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहे. हा दौरा लोकसभा व इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी चर्चा करुन निवडणुकीची चाचपणी केली जाणार आहे. या दौऱ्याच्या पूर्वतयारीसाठी शनिवारी दुपारी 1 वाजता महत्त्वपूर्ण बैठक होत आहे.
या बैठकीत अहमदनगर जिल्ह्याचे संपर्कप्रमुख श्रीकांत भालेराव, राज्य उपाध्यक्ष विजयराव वाघचौरे, बाळासाहेब गायकवाड, दीपक गायकवाड, राजाभाऊ कापसे, दक्षिणेचे अध्यक्ष सुनील साळवे, अजय साळवे, विभागीय प्रमुख भीमराज बागुल, अहमदनगर शहर जिल्हाध्यक्ष किरण दाभाडे, गोविंद दिवे, सुभाष त्रिभुवन, प्रवीण लोखंडे, आबा रणवरे, युवक जिल्हाध्यक्ष अमित काळे, जिल्हा प्रमुख संघटक राजू नाना गायकवाड, जिल्हा सरचिटणीस मनोज काळे, जिल्हा उपाध्यक्ष सुरेश जगताप, विजय खरात, विवेक भिंगारदिवे आदी मार्गदर्शन करणार आहेत.
आगामी निवडणुका संदर्भात सखोल आढावा घेण्यासाठी ही बैठक पदाधिकारी व कार्यकर्त्यांसाठी अत्यंत महत्त्वाची असून, दक्षिण व उत्तरे मधील रिपाईच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना बैठकीला उपस्थित राहण्याचे आवाहन उत्तर नगर जिल्ह्याचे युवक अध्यक्ष पप्पूभाऊ बनसोडे, जिल्हा उपाध्यक्ष रमेश गायकवाड, आयटी सेलचे जिल्हा संपर्क प्रमुख मंगेश मोकळ, संगमनेर तालुकाध्यक्ष आशिष शेळके, श्रीरामपूर तालुकाध्यक्ष सुनील शिरसाठ, नेवासा अध्यक्ष सुशील धाईजे, कोपरगाव अध्यक्ष अनिल रणनवरे, अकोला अध्यक्ष राजू गवांदे, राहता अध्यक्ष धनु निकाळे व करण कोळगे, पाथर्डीचे अध्यक्ष बाबा राजगुरू, कर्जतचे अध्यक्ष संजय भैलुमे, श्रीगोंदाचे अध्यक्ष राजू जगताप, पारनेर अध्यक्ष राजू उबाळे, नगर तालुका अध्यक्ष अविनाश भोसले, जामखेड अध्यक्ष बाळासाहेब शिंदे, शेवगाव अध्यक्ष सतीश मगर, सिद्धार्थ सगळगिळे, मुस्लिम आघाडीचे अय्युब पठाण, छोटू शेख, सलीम शेख आदींसह सर्व युवक जिल्हा पदाधिकारी यांनी केले आहे.