• Tue. Jul 22nd, 2025

वासन टोयोटात टोयोटा रुमियनचे अनावरण

ByMirror

Sep 21, 2023

सर्वसामान्यांच्या आवाक्यातील 7 सीटर टोयोटा रुमियन कडे ग्राहकांची ओढ

अहमदनगर (प्रतिनिधी)- केडगाव येथील वासन टोयोटा शोरुममध्ये टोयोटाने लाँच केलेली सर्वसामान्यांच्या आवाक्यातील 7 सीटर टोयोटा रुमियन कारचे अनावरण आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते झाले. यावेळी इंद्रजीतसेठ नय्यर, अभिजीत खोसे, शोरुमचे जनक आहुजा, अनिश आहुजा, जतीन आहुजा, दिपक जोशी, रविंद्र थोरात, मनोज मदान, कैलाश नवलानी, डॉ.अनिल आठरे, अरविंद गुंदेचा, राजेंद्र चोपडा, संतोष  बोथरा, सुनील मुनोत, सौरभ पोखरणा, महेश बिहाणी, राजासेठ नारंग, निलेश मेहेर, रासकर मामा, आंबेकर, वैभव वाघ, सचिन बारस्कर, निलेश सुंभे, सुरज कोतकर, राहुल जाधव, अभय गुजराथी, नगरसेवक मनोज कोतकर आदी उपस्थित होते.


आमदार संग्राम जगताप म्हणाले की, सर्वसामान्यांना परवडणारी व अद्यावत सोयी-सुविधांचा समावेश असलेली टोयोटा रुमियन ग्राहकांच्या पसंतीस उतरत आहे. टोयोटा हे सर्वात मोठ्या ब्रॅण्डने सर्वसामान्यांचा विचार करुन बनवलेली कार सर्वांना भुरळ घालत असल्याचे त्यांनी सांगितले.


टोयोटा मोटर्सने सर्वात परवडणारी टोयोटा रुमियन कार बाजारपेठेत आणली आहे. टोयोटा रुमियन ही सध्याची कमी खर्चातील आणि दर्जेदार फिचर्सचा समावेश असलेली उत्तम फॅमिली कार ठरली आहे. ज्याची किंमत 10.29 लाख रुपयांपासून सुरू होते. या कारमधील फिचर्स इतर कारच्या तुलनेत उत्कृष्ट आहेत. पेट्रोल आणि सीएनजी पर्यायामध्ये लाँच केलेल्या टोयोटा रूमियनची किंमत विविध रेंजमध्ये पाहायला मिळते.


रुमियनला 1.5-लिटर -सिरीज पेट्रोल इंजिन मिळतं, जे 102 पॉवर आणि 137 टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे, तसेच पर्यायामध्ये ते 87 पॉवर आणि 122 टॉर्क निर्माण करते. गिअरबॉक्स पर्यायांमध्ये मॅन्युअल आणि टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक समाविष्ट आहेत. इंटेरियरबद्दल बोलायचं झाल्यास, नवीन टोयोटा रुमियनमध्ये स्मार्टफोन कनेक्टिव्हिटीसह 7-इंचाची इन्फोटेनमेंट सिस्टम मिळते. याशिवाय टोयोटा आय-कनेक्ट, कनेक्टेड कार तंत्रज्ञान आणि इतर अनेक वैशिष्ट्यांनी ही कार सुसज्ज आहे. तसेच, टोयोटा रुमियनमध्ये वुड इन्सर्टसह ड्युअल-टोन इंटेरियर्स उपलब्ध आहेत.


सुरक्षेच्या दृष्टीने या कारमध्ये ड्युअल फ्रंट आणि साइड एअरबॅग्ज आहेत. त्याच बरोबर या कारमध्ये इंजिन इमोबिलायझर, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी प्रोग्रामसह इतर गुणवैशिष्टये उपलब्ध करुन देण्यात आले असल्याची माहिती अनिश आहुजा यांनी दिली.
टोयोटा रुमियन अनावरणानंतर शोरुममध्ये पहाण्यासाठी व टेस्ट ड्राईव्हसाठी उपलब्ध राहणार असून, शोरुमला भेट देण्याचे आवाहन शोरुमचे जनक आहुजा यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *